Thursday, June 9, 2011

पुर्णगड पूल (सेतू)


पुर्णगड येथे मुचकुंदी नदीवर पुर्णगड पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. हा पूल पुर्णगडहून गावखडी या गावास जोडण्यात आलेला आहे. पुर्णगड पुलावरुन दिसणारे निसर्गाचे सुंदर दृश्य मनात मोहून जाते. पुर्णगड पुलावरुन शेख अलीबाबा यांचा दर्गा पाहता येतो तसेच समोर दृष्टीस पडणारे सुरुबनाचे सुंदर दृश्य मनात भरल्याशिवाय रहात नाही. पुर्णगड पुलाखालुन वाहणारी मुचकुंदि नदी समोर अरबी समुद्रला जाऊन मिळते. आजुबाजुचा हिरवा निसर्ग आकर्षित करतो. नारळ, आंबा या फळांची झाडे मनात गोडी निर्माण करतात.

शेख अलीबाबा दर्गा (पीर)


शेख अलीबाबा यांचा पुर्णगड येथे दर्गा आहे. शेख अलीबाबा यांचा हा दर्गा मुचकुंदि नदीच्या मध्यभागी आहे. हा दर्गा खूप सुंदर आहे. दर्ग्याच्या आतील नक्षीकाम खूप सुंदर आहे. दर्ग्याच्या आतील भागात शेख अलीबाबा यांची समाधी (कबर) आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात शेख अलीबाबा दर्गाचा उरूस भरतो. हिन्दू - मुस्लिम एकत्र येऊन उरूस साजरा करतात. उरुसाला दरवर्षी हजारो भाविक दर्शनाला येतात. शेख अलीबाबा यांचा उरुसाला मोठी बाजारपेठ निर्माण होते, यात प्रसाद व वस्तू विक्री केली जाते. उरुसाला रात्री कवालीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. असे आहे हिन्दू - मुस्लिम धर्माचे प्रतीक शेख अलीबाबा दर्गा.