Tuesday, March 17, 2009

भुलेश्वर


भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे। हे ठीकाण महादेवांच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिध्द आहे. मुळतः हे ठीकाण "मंगलगड" असे होते. मंदिराचे बांधकाम १३व्या शतकातले असुन भिंतीवरील कोरीवकाम व मुर्तीकाम अद्वीतीय आहे. लढाईच्या काळात बर्‍याच मूर्त्याची तोडफ़ोड करण्यात आली. स्त्री रुपातील गणपतीची मुर्ती मी पहिल्यांदाच या मंदिरात पाहिली. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पुजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरातत्रीला येथे खास गर्दी होते.

पुण्यापासून अंदाजे ५० कि।मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते.

1 comment:

Anonymous said...

मस्तच रे!
मी ही 'भुलेश्वर'ला जाऊन आलोय.... छान निसर्गरम्य आणि पौरणिक मंदिर आहे.

भुलेश्वरचे काही फोटो मी इथे चढविले आहेतः

http://bhunga.blogspot.com/2007/08/blog-post_8355.html?page=undefined&albumid=5106016377856654401