Friday, October 31, 2008

त्रिंबकेश्वर



नाशिक पासून 30 कि.मी. अंतरावर‍ गोदावरी नदीच्या तीरावर त्रिंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. येथील शिवलींगाचे वैशिष्ट म्हणजे या शिवलींगावर ब्रम्हा, विष्णू, महेश यांची रूपे आहेत.
येथील देऊळ पुर्णपणे काळ्या दगडापासून बनले असून ब्रम्हगीरीच्या पवाताच्या पायथ्याशी आहे. वेगवेगळे धार्मिक कार्यांसाठी महाराष्ट्रातून लोक येथे येतात.
नारायण-नागबळी, काल-सर्प शांती, त्रिपींड विधी येथे केल्या जातात. नारायण नागबळी ही पुजा फक्त त्रिंबकेश्वर येथेच केली जाते. ही पुजा तीन दिवसांची असते.येथे ब्राम्हणांची संख्या पुष्कळ आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर आश्रम व मठ आहेत. पावसाळ्यात येथे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते.

जाण्याचा मार्ग : नाशिक पासुन 30 कि.मी. अंतरावर हे देऊळ आहे.

मदुराईचे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर

तमिळना़डूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. या मदुराईतच आहे, प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडं नि त्याच्याशी स्पर्धा करत आकाशाकडे हात फैलावत गेलेली गोपूरे. मदुराईची ही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. शहराच्या बरोबर मध्ये मीनाक्षी मंदिर वसले आहे.मदुराईचा इतिहास फार मोठा आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून तो सुरू होतो. मदुराईवर राज्य करणाऱ्या पांड्य घराण्याएवढे राज्य दुसऱ्या कोणत्याही भारतीय राजघराण्याने केले नाही. इसवी सनापूर्वी चारशे ते पाचशे वर्षे ते अकदी चौदाव्या शतकापर्यंत या घराण्याने मदुराईवर एकछत्रीपणाने अंमल गाजवला. मात्र, त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने पांड्यांचा पराभव करून मदुराईचा ताबा घेतला. काफूरने मीनाक्षी मंदिर, सुंदरेश्वरम मंदिराचे बाहेरचे दरवाजे व बुरूजही तोडले होते. सुदैव म्हणून आतले मंदिर वाचले. नंतर बाहेरचे गोपूर पुन्हा एकदा बांधले गेले.
मीनाक्षी शतकाच्या मध्यात विजयनगरच्या राजाने विश्वनाथ नायक याला मदुराईचा राज्यकारभार पाहण्यासाठी पाठविले. त्याच्या बरोबर सेनापती आर्यनायक मुठली हा सुद्धा गेला. नायक वंशात तिरूमलाई नायक हा सर्वांत पराक्रमी होता. त्याने 1659 पर्यंत राज्य केले. त्याच्याच काळात मदुराईत भव्य इमारती बांधल्या गेल्या.मीनाक्षी मंदिराचे सध्याचे स्वरूप हे कुणा एका राजामुळे आलेले नाही, तर अनेक राजांनी त्यात सहभाग घेतला आहे. मंदिराचे आवार भव्य आहे. 240 मीटर लांब व 260 मीटर रूंद असा हा परिसर आहे. त्याच्या या विस्तारामुळे भक्त, पर्यंटकांची दमछाक होते. काय नि किती पाहू असे होते.या आवारात अनेक छोटी, मोठी मंदिरे आहेत. येथेच एका बाजूला श्यामवर्ण मीनाक्षीदेवीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. तिच्या आजूबाजूला अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. जवळच सोन्याचा मुलामा दिलेला स्तंभ आहे. त्याच्या उत्तरेला सुंदरेश्वर मंदिरेचा गोपूर आहे.
सुंरेश्वरम मंदिरच्या चारीही बाजूला गोपूर आहेत. त्यावर हिंदू देवदेवतांच्या, पशूपक्ष्यांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक गोपूर नऊ मजली आहे. त्याचे प्रवेशद्वारे वीस मीटर उंच आहेत कुंबथडी मंडपममध्ये शंकरासह अनेक देवदेवतांच्या तसेच ऋषीमुनींच्या प्रतिमा आहेत. जवळच्याच एका कक्षात मीनाश्री व सुंदरेश्वरजी यांची वाहने आहेत. येथेच चांदीत मढवलेला हंस व नंदी आहेत. तेथून थोड्या अंतरावर मदुराईचा राजा विश्वनाथ नायक याचा मंत्री आर्य नायक मुठलीच्या काळात बनविलेला सहस्त्रस्तंभ मंडप आहे. यात एकूण 985 स्तंभ आहेत. यावरही देवदेवता, नृत्यांगना, योद्धे यांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराला चार दारे आहेत. प्रवेशद्वारावर गणपतीची पमोठी प्रतिमा आहे. या मंदिराबाबत एक दंतकथा आहे. मलयाराजा पंड्या निपुत्रिक होता. म्हणून राजा व राणीने एक यज्ञ केला. यावेळी अग्नीतून तीन वर्षीय बालिका प्रकट झाली. ती होमातून बाहेर पडून थेट राणी कंचनमालाकडे गेली.
मोठी झाल्यानंतर या राजकुमारी मीनाक्षीने मोठा पराक्रम गाजवला. आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करून तिने स्वतःचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यानंतर कैलास पर्वतावर जाऊन शंकराची आराधना केली व त्याला पती म्हणून मिळविण्यात ती यशस्वी ठरली. मीनाक्षी मंदिराच्या जवळच सुवर्ण पुष्करणी नावाचे सरोवर आहे. त्याच्या बाजूला सुंदर हिरवाई आहे. फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्तीला येथे आणून या सरोवरात स्नान घातले जाते. अलगार मंदिरमदुराईपासून अठरा किलोमीटरवर मीनाक्षीदेवाचा भाऊ अलगार याचे मंदिर आहे. त्याच्यासंदर्भातही एक दंतकथा सांगितली जाते. मीनाक्षीदेवीच्या लग्नाला अलगार निघाला होता. मात्र, नगरात पाऊल ठेवण्याआधीच त्याला लग्न झाल्याचे कळले. तो आल्यापावली परत गेला. चैत्रात मीनाक्षीदेवी व सुंदरेश्वर यांचा विवाह सोहळा होततो. विवाहनंतर वेगा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही प्रतिमा आणल्या जातात. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर अलगाराची प्रतिमा आणली जाते नंतर ती परत नेली जाते.

पैठण

औरंगाबादपासून दक्षिणेकडे ५६ किलोमीटरवर पैठण तालुका आहे. हा तालुका गोदावरी नदीच्‍या तीरावर वसला आहे. याला मराठवाड्‍याचे प्रवेशद्‍वार म्‍हणूनही संबोधतात. या तालुक्‍याला ऐतिहासिक व नैसर्गिक असे महत्‍व आहे. येथे एकनाथ महाराजांमुळे पैठण प्रसिद्ध आहे. शिवाय पैठणी साड्‍यांचे निर्मिती केंद्रही येथेच आहे. गोदावरी नदीवरील सर्वंत मोठे जायकवाडी धरण येथेच आहे. याच धरणाच्या पाण्यावर ज्ञानेश्‍वर उद्‍यान आहे.पैठणला एकनाथ महाराजांची समाधी आहे. ही समाधी गोदावरी तीरावर एका आकर्षक व विलोभनीय मंदिरात आहे. या ठिकाणी षष्ठीच्‍या दिवशी नाथषष्ठी नावाने मोठी यात्रा भरते. महाराष्‍ट्रातील वारकरी संप्रदाय या वेळी मनोभावे येथे उपस्‍थित असतो. येथेच ज्ञानेश्‍वर महाराजांनी रेड्‍याच्‍या मुखातून वेद वदवून घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. पैठण जगप्रसिद्ध पैठणी साड्‍यांसाठी प्रसिद्‍ध आहे. या साड्‍यांना आकर्षक असा जरतारी पदर असतो. या साडीमध्‍ये स्त्रीचे सौंदर्य अतिशय खुलून दिसते. या साड्‍या हातावर विणल्‍या जातात.
येथील पैठणी हातमाग केंद्राला भेट देऊन थेट तेथूनच पैठणी खरेदी करू शकतो.प्रसिद्ध जायकवाड धरण पाहणे हा अतिशय रम्य अनुभव आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्याला आता नाथसागर असे संबोधततात. या धरणाचे वैशिष्ट्‍य म्‍हणजे ते सपाट जमिनीवर आहे. अशा प्रकारचे ते आशिया खंडातील केवळ दूसरे धरण आहे. शिवाय त्याचे बांधकाम मातीत केले आहे. धरणाची भिंत जवळजवळ पंधरा किलोमीटर लांबीची आहे. धरणाला सत्‍तावीस मोर्‍या आहेत.
या धरणाला मराठवाड्‍याला अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. या धरणावर मासेमारीही चालते. धरणातील माशांची चव आपल्‍याला येथील हॉटेलमधून चाखायला मिळते. या धरणावर संध्‍याकाळ घालवणे हा विलोभनीय अनुभव आहे. धरणाच्‍या भिंतीवर उभा राहून धरणातील पाणी पाहिल्‍यास या धरणाची दोन रूपे आपणास पहायला मिळते. एक रूप अतिशय मनमोहक आणि दुसरे आक्राळ विक्राळ. हे धरण पहाताना एखाद्‍या सागराच्‍याच किनारी असल्‍याचा आपल्‍याला भास होतो. संध्‍याकाळी क्षितिजापलिकडे डुंबणार्‍या सुर्याची क‍िरणे समुद्राच्‍या पाण्‍याला सोनेरी करून टाकतात.
हे दृश्‍य अतिशय मनमोहक दिसते. जवळच ज्ञानेश्वर उद्यान आहे. या उद्यानाचे वैशिष्‍ट्‍य म्हणजे ते म्‍हैसूरच्‍या वृंदावन गार्डनची प्रतिकृती आहे येथे लहानांपासून मोठ्‍यांपर्यंत सर्वांच्‍याच मनाला विरंगुळा मिळतो. मनमोहक फुलांनी युक्‍त असा बगिचा येथे आहे. लहानग्यांना खेळण्‍यासाठी खेळ उद्यान आहे. मुलांसाठी आगगाडी आहे. रंगीबिरंगी कारंजे आहेत. पोहण्‍याचा आनंद लुटण्‍यासाठी धबधबाही आहेपाण्‍याच्‍या तालावर नाचणारे पाणी पहाण्‍याचा एक वेगळाच आंनंद आहे. येथे आल्यानंतर आपण आपला थकवा विसरून उत्साह, आनंद मिळवतो.

प्राणीपक्षांच्या सानिध्यात मुक्त भटकंती... नागझिरा वन्यजीव अभयारण्य


नागझिरा वन्यजीव अभयारण्याचे निर्सगाच्या कुशीत इंद्रधनुषी सौदर्यांने नटलेला स्वप्नातील भूप्रदेश असेच वर्णन करावे लागेल. येथील वन्यप्राणी व जैवीक विविधता चकीत करणारी आहे. लांबच लांब पसरलेले नवश्रीने नटलेले सुंदर जमीनीचे पट्टे.... निर्सगाच्या सौदर्याविष्काराचे मनोहारी रूप प्रतिबिंबीत करणारी नैसर्गिक तळे...चांदण्या रात्रीच्या निवांत शांततेत पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांना याची देही याची डोळा बघण्यातला थरार... प्रातसमयी उगवतीची किरणे पडायला सुरूवात झाल्यावर पक्षांच्या मंजूळ सुरावटीने भारून गेलेले वातावरण.... अनुभवायचे ते नागझिर्‍यातच. नागझिर्‍यची जादू वर्षाकाठी 30,000 हजार पर्यटकांना साद घालते.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात 152 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात नागझिरा परसले आहे. नागझिरा 1970 साली अस्तित्वात आले. गोंदिया जिल्ह्यास मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या सीमा लागल्या आहेत. वैनगंगा नदीने येथील नैसर्गिक विविधतेत भर घातली आहे. नागझिर्‍याची भूमी विविध वन्यजीव व वनस्पतींनी समृद्ध आहे. अभयारण्यातून फिरताना छोट्या-मोठ्या पर्वतरांगा व विस्तीर्ण पसरलेली तळी दृष्टीस पडतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या उंच टेकड्या व हिरव्याकच्च वनराईत आढळणारी नै‍सगिर्क तळी मनास सुखावतात. नागझिर्‍यात कित्येक प्रकारच्या मासळ्या आढळतात. सस्तन प्राण्यांच्या 34 प्रजाती, पक्षांच्या 160, सरपटणार्‍या प्राण्यांच्या 30 हून अधिक अनं फुलपाखरांच्या 50 प्रजातीं येथे आढळतात. नागझिर्‍यातील जंगल सफर डोळ्याचे पारणे फेडण्यासोबतच विविधांगी अनुभव देते. वाघ, बिबटे, चितळ, अस्वल, रानगवे, रानकुत्रे, निलगाय, खवल्या मांजर येथील प्राणीजीवन समृद्ध करते. वृक्षवल्लीही जैविक विविधतेत भर घालणारी. आवळा, कुसुम, सेमळ, तेंदु, जावळ, साग, बेहडा, उंबर यासारखी वृक्षे येथे आढळतात.

नाग‍झिर्‍याहून जवळत 50 किलोमीटर अंतरावर नागझिर्‍यास भेट द्यायची झाल्यास उप-वनसंरक्षकास संपर्क साधून आवश्यक माहिती घ्यावी म्हणजे वेळेवर तारांबळ उडणार नाही. या भागातील भूभागास दृष्टीलागण्याजोगे सौदर्य लाभले आहे. नागझिर्‍याची सैर झाली की आपण नवेगाव राष्ट्रीय उद्यानासही भेट देवू शकता. इटीयाडोहही येथून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर आहे. अन हं, ट्रेकर्ससाठी अवघ्या 70 किलोमीटरवर प्रतागगढही आहे. दिवसभर जंगलसफारी आटोपल्यावर जंगलातील रात्रीच्या निवांत क्षणातील वन्यजीवांच्या हालचाली न्याहाळायच्या असतील तर मधुकुंज, लताकुंज ही विश्रामगृहेही आपल्या सेवेत आहेत. निसर्गयात्री मारूती चितमपल्ली यांनी येथील रानवाटा तूडवल्या आहेत. मनात हर्ष भरणार्‍या हिवाळ्याचे आगमन होतच आहे तर व्हा मग सज्ज आपणही तूडवायला नागझिर्‍याचा रानवाटा....

जाण्याचा मार्ग : नागझिर्‍यास आपण विमान, रेल्वे व रस्ता मार्गे पोहचू शकता. येथून नागपुर विमानतळ अवघ्या 120 किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन आहे गोंदिया. अंतर आहे फक्त 45 किलोमीटर. बसने जायचे झाल्यास साकोली (22 किलोमीटर) येथून गाड्यांची सेवा उपलब्ध आहे.

भेट द्यायची उत्तम वेळ : ऑक्टोबर ते एप्रिल. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत.

Thursday, October 30, 2008

गेटवे ऑफ इंडिया

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ह्या बहुरंगी, बहुढंगी शहराने सांस्कृतिक विविधताही जपली आहे. भारताचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहराने कलात्मक वारसाही जपला आहे. वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेले गेट वे ऑफ इंडिया त्यातीलच एक. इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या 1911 सालच्या ऐतिहासिक भेटी स्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. जॉर्ज यांच्या स्वागतासाठी त्यावेळच्या अपोलो बंदराच्या पायथ्याशी मोगलाई थाटाचा तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता. भेटीच्या स्मृती कायम स्वरूपी जपण्यासाठी स्मारक उभारण्याची योजना आखण्यात आली. जॉर्ज विट्टे या वास्तुविशारदाच्या कल्पनेतून साकार झालेली ती वास्तु म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया सोळाव्या शतकातील गुजराती धर्तीच्या शिल्पकेलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पिवळ्या बसातर दगडात ह्या वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे.
नजीकच्या ठाणे जिल्ह्यातूनच खरोदी खाणीतून हा दगड काढण्यात आला होता. वास्तूवरील घुमट व सज्जे सलोह कॉंक्रीटचे आहेत. वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. तिच्या लांबीची एक बाजू पूर्वेकडील सागरतीराला समांतर असून या बाजूत मधोमध मोठ्या आकाराचा कमानयुक्त दरवाजा व त्यालगत दोन्ही बाजूस छोटे दरवाजे आहेत. वास्तूची मागची बाजूही सारखीच आहे. या अद्वितीय वास्तूच्या उभारणीसाठी अकरा वर्ष लागले. मुंबई म्हटले की पहिल्यांदा आठवते ते गेटवे ऑफ इंडिया. ही वास्तु ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू ठरली आहे.
मुंबईत पाय ठेवला की पर्यटकांची पहिली भेट असते ती अर्थातच गेटवे ऑफ इंडियास. गेटसमोर व बाजूच्या बागेत पर्यटक छायाचित्र काढून आपल्यासोबत स्मृती घेऊन जात असतात. येथे उभे राहून दूरवर पसरलेला समुद्र व बंदरावर माल उतरवून घेण्यासाठी ताटकळत बसलेले देश विदेशातील जहाज पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. अनेक सरकारी व खाजगी कार्यक्रमांची ही वास्तू साक्षीदार आहे. बिटींग दी रिट्रिट असो किंवा एखाद्या खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीवरील गीत मालिकेचा कार्यक्रम सर्वांनाच गेटवेची पार्श्वभूमी हवी असते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी: राजे पाचवे जॉर्ज यांचे आगमन होणार असल्याने मुंबानगरीत आनंदाचे उधाण आले होते. शाही मिरवणूक निघणार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमली होती. सकाळी दहा वाजता जॉर्जना घेऊन येणार्‍या मेरिना जहाजाचे बंदरात आगमन झाले. जॉर्ज व राणीचे आगमन झाल्यावर त्यांना लष्कराची मानवंदना देण्यात आली. यानंतर बग्गीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. ते तीन दिवस थांबले. मेरिना बोटीवरच शाही दांपत्याचा मुक्काम होता. शहरातील भेटी आटोपल्यानंतर ते दिल्ली व कलकत्त्यासाठी रवाना झाले. दहा जानेवारीला ते मुंबईत परतले व गेटवे ऑफ इंडिया येथूनच भारताचा निरोप घेऊन समुद्र मार्गे इंग्लंडला परतले.

निसर्गरम्य फणसड अभयारण्यातून भटकंती


निसर्गाची विविधांगी रूपे याची देही याची डोळा अनुभवण्यातील आनंद अवर्णनीय असतो. कोकणातील फणसड वन्यजीव अभयारण्यात आपणांस याची प्रचीती येईल. विधात्याने सृष्टी सौंदर्याची लयलूट केलेल्या निसर्गासोबतच नयनरम्य समुद्रकिनारे हे फणसड अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे. रायगड जिल्हयातील रोहा व मुरूड तालुक्यात सुमारे त्रेपन्न चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात हे अभयारण्य पसरले आहे. जैवविविधतेने समृद्ध नटलेल्या समुद्रकिनारपट्टीलगतच्या जंगलाची विविध रूपे पाहायची ती येथेच. अभयारण्यात सुमारे एकवीस जातींच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. याशिवाय विविध वनस्पतींच्या सुमारे एक्क्यांनऊ प्रजातीं येथे आहेत. यावरून येथील जैविक विविधता लक्षात येईल.

औषधी वनस्पतींचाही येथे खजिना आहे. विधात्याने नैसर्गिक जैवविविधतेची येथे लयलूट केली आहे. सांबर, चित्ता, जंगली अस्वल या प्राण्यांचा येथील वनश्रीने नटलेल्या जंगलात मुक्त संचार आढळतो. येथील हिरव्यागार जंगलातून पक्षांच्या सुरेल सुरावटींच्या सानिध्यात मुक्त भटकंतीचा अनुभव अविस्मरणीय असतो. सुपेगावातून निसर्ग सहल नैसर्गिक सौंदर्याचा साक्षात्कार घडवते. निसर्गप्रेमींना माजगांव येथील निसर्ग केंद्रासही भेट देता येईल.
अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल.
अरबी समुद्राच्या आकाशास भिडणार्‍या लाटा झेलत स्थितप्रज्ञासारखा उभा असलेल्या जंजीर्‍यास भेट द्यायला विसरू नका. येथे थरार, रोमांच, साहस, अशा मिश्रित भावनांच्या अद्वितीय अनुभवाचे आपण धनी व्हाल. ऑक्टोबर ते एप्रिल ही येथे भेटीची उत्तम वेळ आहे. निर्सगाच्या सानिध्यात काही काळ घालवायचा असल्यास येथे निवासाची व्यवस्थाही आहे. कसे पोहचायचे? विमान, रस्ते व रेल्वेने येथे पोहचता येते. मुंबई हे जवळचे विमानतळ आहे. कोकण रेल्वेने जायचे झाल्यास रोहा हे येथून तीस किलोमीटर अंतरावर स्टेशन आहे. मुंबईहून येथील अंतर दीडशे तर अलिबागहून पन्नास किलोमीटरवर अभयारण्य आहे.

सहयाद्रिचि स्वप्नभुमि ताम्हिणी

बरसत्या पावसाची मजा आपण नेहमीच घेत असतो. पण सह्यादीच्या बेलाग डोंगररांगेतल्या पावसाचा सळसळता अविष्कार आपल्याला कल्पनाही करता येणार नाही, एवढा वेगळा असतो. गेल्या काही वर्षांत यातल्या काही काही ठिकाणी घाट रस्ते झाल्याने आता सर्वसामान्यांना ही मजा सहज लुटता येते. रायगड जिल्ह्यातल्या कोलाड-इंदापूरला पुण्याशी जोडणारा असाच एक जबरदस्त घाट आहे 'ताम्हिणी'. ............. कोकण आणि घाट यांच्यामधल्या पट्ट्यातला बराच प्रदेश दुर्गम आणि घनदाट अरण्याचा असल्याने तिथली खोरी आजही आपल्याला परिचित नाहीत. त्यातले बरेचसे प्रदेश रुंद व खूप विस्तृत आहेत. रायगड जिल्ह्यातल्या सुधागड-पालीपासून ते पार सावंतवाडीपर्यंत आजही घाटाला जोडणारे दुर्गम डोंगरी मार्ग आहेत व स्थानिक लोक पायीच या वाटांवरून जात असतात. ताम्हिणी घाटाचा चाळीस-पन्नास मैलांमधला परिसर काही वर्षांपूवीर् असाच कोणाच्या माहितीचा नव्हता.
पाच-सात वर्षांपूवीर् घाट बांधल्यापासून मात्र इथल्या भन्नाट निसर्गाची ओळख सर्वसामान्यांना व्हायला लागली. मंुबई-ठाण्याच्या बऱ्याचशा लोकांना आजही हा प्रदेश अनभिज्ञ आहे. पावसाळ्याच्या मौसमात घाटात आपण जसजसे उंची गाठायला लागतो, तसंतसं मुसळधार पावसाचा, भन्नाट, वाऱ्याचा, अगणित धबधब्यांचा आणि ढगांचा कधीही न अनुभवलेला धमाल खेळ आपल्याला दिसायला लागतो. त्यात घाटमाथ्यावर पोहोचल्यावरही पंधरा-वीस किमीपर्यंत गदीर्चा मागमूस नसल्याने आपण चक्क वेगळ्या जगात असल्यासारखंच वाटतं. जवळजवळ सगळेच धबधबे रस्त्याच्या निकट असल्याने कुटुंबातल्या वृद्धांनाही यात डुंबता येतं व पावसाळ्यातल्या सह्यादीचे ढगांनी वेढलेले डोंगर-कडे जवळून बघता येतात. मात्र खाण्याच्या काहीही सोयी नसल्याने बरोबर सगळं न्यावं लागतं. इथल्या निसर्गाची खरी मजा अनुभवायची असेल तर गोवा रस्त्यावरच्या कोलाड-भिरा-ताम्हिणी-मुळशी-पिरंगूट-पुणे ही एक दिवसाची ट्रीप करायला हवी.
मंुबईहून हे अंतर सहज साडेतीनशे किमीच्या आसपास होतं. जाताना कोकणातल्या मार्गाने गेलं तर सतत आपल्या अगदी नजरेसमोर निसर्गाचा हा खजिना दिसत राहतो आणि संध्याकाळी एक्स्प्रेस वे वरून मंुबई गाठणं, सोयिस्कर जातं. घाट पार केल्यावर वाटेतल्या विंझाईदेवीचं दर्शनही होतं. मुळशी जलाशय पार करून पुण्याकडे सरळ गेलं की एक्सप्रेस वे लागतो. पहाटे लवकर निघालं तर ही सहल एका दिवसात करता येते. अगदी इथे थांबायचं असेल, तर ताम्हिणी गावातल्या विझाई देवस्थानच्या धर्मशाळेत, मुळशीला किंवा घाटाखाली कोलाड-भिऱ्याला एक मुक्काम करायला हवा, या सगळ्या ठिकाणी राहण्याच्या अगदी साध्या सोयी आहेत. एवढं मात्र निश्चित आहे की सह्यादीतल्या निसर्गाविषयी मनापासून प्रेम असणाऱ्यांना ताम्हिणी घाटाचा हा प्रदेश स्वप्नभूमीच आहे.

'महिकावती'ची हिराडोंगरी गवसली


तालुका पालघर.. पश्चिमेला वैतरणा नदी आणि पूवेर्ला अथांग समुद. याच किनाऱ्यावर वसलेलं दातिवरे गाव. इथला दातिवरे किल्ला तसा माहितीतलाच. याच किल्ल्यापासून केवळ १०-१५ मिनिटांच्या अंतरावर असलेली दीडशे फूट उंचीची दुर्लक्षित डोंगरी. किल्ले वसई मोहिमेच्या गटाने औत्सुक्यापोटी या डोंगरीवर पाऊल ठेवलं अन महिकावतीच्या बखरीमध्ये असलेली हिराडोंगरी हीच असा साक्षात्कार या गटाला झाला. किल्ले वसई मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या तरुणांकडून गेल्या पाच-सहा वर्षांपासून ठाण्यातील किल्ल्यांचा अभ्यास सुरू आहे. वसईच्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आणि लोकांमध्ये या विषयावर रुची तयार करण्यासाठी हे सर्व तरुण आपला वेळ देतात. या मोहिमेचे श्रीदत्त राऊत म्हणाले, ठाणे जिल्ह्यात असलेल्या किल्ल्यांची अधिकृत संख्या ५५ आहे. गढी वा किल्ले याबाबत मतमतांतरं असली, तरी इतिहास संशोधक आप्पा परब यांच्यामते मात्र हा आकडा ७० च्या घरात जातो. तसे संदर्भही त्यांनी दिले होते. हे लक्षात घेऊन, दुर्लक्षित किल्ले शोधण्यावर मोहिमेचा भर होता.

याच दरम्यान महिकावतीच्या बखरीमध्ये वैतरणा नदी आणि हिराडोंगरीचा नामोल्लेख असल्याचं आढळलं. या डोंगरीला दांडामित्रियं असंही नाव दिलेलं आढळतं. राऊत म्हणाले, दातिवरे किल्ला पोर्तुगीजकालीन असल्यामुळे किल्ल्याच्या आसपास इतरही गढीवजा किल्ले असण्याची शक्यता होती. कारण पोर्तुगीज किल्ल्याच्या रक्षणार्थ खाडीच्या आसपासच्या प्रत्येक मुखावर, पाच-सहा ठिकाणी अशा गढ्या ते बांधत. म्हणूनच गेल्या दोन वर्षांपासून या किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर पिंजायला सुरूवात झाली. चिमाजी अप्पांनी वसई ताब्यात घेताना दातिवऱ्याचा उल्लेख केला. हे सैन्य माहीमच्या खाडीतून वसईत आलं. त्यावेळी त्यांनी दातिवऱ्याच्या खाडीलगत थांबा घेतला. इथे मराठ्यांचं सैन्य तब्बल ३८ हजार इतकं होतं. य.न. केळकर यांच्या लिखाणात हा संदर्भ आढळतो. केवळ किल्ल्यावर इतके लोक राहणं शक्य नाही. त्यासाठी या डोंगरीचा आश्रय घेतला गेल्याचं राऊत म्हणतात. या डोंगरीवर सहा पायऱ्यांसह एक पाण्याचं टाकं, विवरं आणि तीन गुहाही आहेत.

दीडशे फुटांच्या या डोंगरीवरून अर्नाळ्याचा बुरूज थेट दिसतोच. शिवाय जीवधन किल्ला, भवानगड, अशेरीची रांगही दिसते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, वैतरणा नदीचं संपूर्ण पात्र इथून दिसतं. त्यामुळे ब्रिटिशकालीन व्यापारावर नजर ठेवता येत असे, अशी माहिती राऊत यांनी दिली. याबाबत मुंबई पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता, याबाबत आपल्याकडे अद्यापि माहिती आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. या डोंगरीवरच्या दगडामध्येही किमान पाच रंग दिसतात. त्यामुळे बांधकामासाठी इथले दगड नेले जात असल्याचंही ते म्हणाले. पुरातत्त्व अभ्यासकांना इथे येऊन त्याचे संदर्भ मिळवता येतील. तसंच, ही डोंगरी एक उत्तम आणि महत्त्वाचं ऐतिहासिक स्थळ बनेल. या डोंगरीच्या अधिक माहितीसाठी श्रीदत्त राऊत यांच्याशी ९८१९७९९९४७ इथे संपर्क साधता येईल

वनातील काळदुर्ग


झिम्माड पाऊस अनुभवायचा असेल तर श्रावण महिन्यासारखा दुसरा उत्तम काळ नाही. श्रावण महिन्यात साऱ्या चराचराला नुसता बहार आलेला असतो. अशा वेळी आमच्या सारख्या निसर्गवेड्या माणसांना या काँक्रीटच्या जंगलात थांबणं कठीण होतं आणि आमची पावलं आपसूकच निसर्गाकडे ओढली जातात. पावसाळी रविवार म्हटलं की पावसात भिजायला बाहेर पडलेली बेधुंद तरुणाई, एखादं धबधब्याचं ठिकाण, त्या ठिकाणी भिजण्यासाठी कुंभमेळ्याप्रमाणे जमलेले शेकडो पर्यटक... अशा वेळी पावसाची खरी मजा लुटता येत नाही. म्हणूनच आम्ही जरा हटकेच ठिकाण निवडले आणि आमचा मोर्चा काळदुर्गाकडे वळवला. भटक्यांच्या यादीत दुय्यम स्थान असलेल्या काळदुर्गाला पोहोचण्यासाठी पहाटे विरारहून सुटणारी ६.२० ची शटल पकडायची आणि पालघरला उतरायचं. पालघर एस.टी. स्थानकातून मनोरकडे जाणारी एस.टी. बस पकडायची आणि वाघोबाच्या खिंडीत दाखल व्हायचं.

काळदुर्गाला जायला आम्ही थोडा आरामदायी मार्ग निवडला. मंुबई-अहमदाबाद महामार्ग असलेल्या मस्तान नाक्यावरून आमची कार मनोर-पालघर रस्त्यावर वळली आणि आतापर्यंत दडी मारून बसलेल्या पावसाने आमचं जोरदार स्वागत केलं. साधारण दहा किमी अंतर पार केल्यावर सुर्या नदीवरचा पूल ओलांडून वळणावळणाच्या घाट रस्त्यावरून आम्ही वाघोबाच्या खिंडीत पोहोचलो. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे घाटात धबधब्याचं कोसळणं सुरू झालं होतं. तर वरच्या बाजूला ढगांचा पडदा बाजूला सारून काळदुर्ग आम्हाला खुणावत होता. खिंडीत असलेल्या आदिवासींच्या वाघदेवामुळे या खिंडीला 'वाघोबाची खिंड' असं नाव पडलं आहे. पालघर-मनोर रस्त्यावरून जाणारे बरेच पर्यटक इथे देवदर्शनासाठी थांबतात पण हाकेच्या अंतरावर असलेला काळदुर्ग त्यांना माहीत नसतो.

पाऊस थांबला होता. आम्ही गाडीतून उतरलो. देवाला नमस्कार केला व देवळाच्या मागून चढणीच्या वाटेला लागलो. कारवीच्या दाट जंगलातून जाणारी वाट आपल्याला वर घेऊन जाते. इथून गडावर पोहोचायला साधारण दीडतास पुरेसा होतो. खरं तर वाट चुकायची शक्यताच नाही. परंतु यंदा फुललेली कारवी न्याहाळण्यात, वाटेत दिसणारे वेगवेगळे किटक पाहण्यात, त्यांची छायाचित्रं काढण्यात आम्ही मुख्य रस्ता केव्हा सोडला ते कळलंच नाही. वाटेत आलेली झाडंझुडपं बाजूला सारत, दमवणारा उभा चढ चढत आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. समोरच कातळाचं पठार दिसत होतं. स्थानिक लोक या पठाराला नंदीमाळ म्हणतात. इथून प्रथमच काळदुर्गाचं व्यवस्थित दर्शन घडलं. इथून पुढे जंगलात शिरलेली वाट आपल्याला एका घळीत घेऊन जाते. बाजूला वाढलेल्या कारवीमुळे उतार जाणवत नाही. काळदुर्गाला वळसा घालून शेवटचा उभा टप्पा पार करून आम्ही माथ्यावर पोहोचलो आणि श्रावण खेळाला सुरुवात झाली. झिम्माड पाऊस आणि बेभान वारा यांची जणू जुगलबंदीच सुरू होती. संपूर्ण दरी ढगांनी भरलेली पाहून जणू स्वर्गातच पोहोचल्याचा भास होत होता. माथ्यावर गडाच्या काहीच खुणा नाहीत.

कातळात खोदलेली पाण्याची तीन टाकी मात्र आहेत. शेवटचा टप्पा चढण्याअगोदर एक शंकराची पिंड, मंदिराचे मोडके अवशेष व नंदी आहे. गडाच्या माथ्यावरून चौफेर नजर टाकली असता उत्तर पूवेर्ला असलेला कोहोजचा किल्ला, उत्तरेला असलेला अशेरीगडमधूनच वाहणारी सुर्या नदी, पुढे वैतरणा नदीशी झालेला तिचा संगम, जवळच उत्तरेला असलेला आसावा दुर्ग व त्याच्या पायथ्याशी असलेला देवकोपाचा तलाव. पश्चिमेला दिसणारी सातपाटी, केळदे माहिमची किनारपट्टी आणि पालघरचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. सभोवार पसरलेला हा नजारा, बेभान झालेला वारा मनाच्या कप्प्यात बंदिस्त करून आम्ही गड उतरू लागलो. तेव्हा मनाशी एक निश्चय केला, पुढच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा काळदुर्गला यायचंच!

येवा सिंधुदूर्गात स्वागत असा


क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात चंदेरी वाळूच्या किनार्‍यावर मुक्तपणे हिंडताना कोळी बांधवांचा जाळे फैलावण्याचा खटाटोप चाललेला... मासेमारीसाठी पारंपारिक बोटी समुद्रात ढकलल्या जाताहेत... मनाच्या कप्प्यात कोठेतरी जपलेल्या या चित्राची वास्तव अनुभूती आली तर? कोकणातील कुठल्याही किनाऱ्यावर हा अनुभव घेता येतो. पण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नितळ किनार्‍यांवरची त्याची अनुभूती काही वेगळीच. एकिकडे हिरवाईने नटलेल्या भूतलास कवेत घेणारा विशाल सह्याद्री तर दुसरीकडे निळ्याशार सौदर्याचा अविष्कार करणारा अरबी समुद्र. यादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश पर्यटकांना सृष्टीसौंदर्याचे अनुपम दर्शन घडवतो.
कोकणातील वेंगुर्ला हा तर स्वप्ना‍तला गाव. मंगेश पाडगावकरांचे जन्मगाव असलेल्या गावातील स्वप्नाळूपणा त्यांच्या कवितांत अवतरला नसता तरच नवल. वेगुर्ल्याला शुभ्र वाळूचा समुद्रकिनारा लाभला आहे. गावाभोवतालच्या टेकड्यांवर नारळ, काजू, आंब्याच्या बागा बहरल्या आहेत. एखाद्या चित्रात फिट्ट बसावे असे हे गाव. विलक्षण निसर्गसौंदर्याच्या कोंदणात वसले आहे. येथील रामेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. येथून जवळच नारळाच्या झाडीत लपलेले सुंदर शहर म्हणजे मालवण. दगडी भूप्रदेशात सिंधुदुर्ग व पद्मगड हे दोन जलदुर्ग आहेत. त्यांना जोडणारा भुयारी मार्ग असल्याचे सांगण्यात येते. एकेकाळी व्यापारी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवणने मिठागरे, चिनी मातीची भांडी व मालवणी खानपानासाठी ख्याती प्राप्त केली आहे.
लांबच-लांब पसरलेले समुद्रकिनारे, आपल्या उंचीने ढगांच्या उरात धडकी भरवणारी नारळाची झाडे, स्वच्छ सुर्यप्रकाशात तब्बल वीस फुटापर्यंयत समुद्राचा तळ दिसेल एवढे नितळ समुद्र सिंधुदुर्गाशिवाय इतरत्र पहायला मिळणे दुरापास्तच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला तालुक्यात तारकर्ली, शिरोडा, वेळागर, निवाटी हे प्रदुषण व मानवी हस्तक्षेपापासून मुक्त समुद्रकिनारे आहेत. धकाधकीच्या शहरी आयुष्यातून हद्दपार झालेला निसर्ग आपल्याला येथे भेटतो. येथील निवांतपणा कुठल्याशा पवित्र शांततेचीही अनुभूती देतो. मन स्वच्छ झाल्यासारखे वाटते. सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत हातात कॅनव्हास, ब्रश घेवून मुक्तपणे फिरून विधात्याने निर्माण केलेले मनोहारी चित्र आपल्या मनावर उतरवण्याचा प्रयत्न करून बघायचा, तोही येथेच.
येथील समुद्रकिनार्‍यावरील सुर्यास्तावेळचे रंगाची उधळण करणारे दृश्य आयुष्यभर आपणांस आनंद देत राहील. नैसर्गिक सौदर्यासोबतच साहसी पर्यटक व इतिहासप्रेमीनाही सिंधुदूर्ग आवर्जून बोलावतो. सतराव्या शतकात बांधण्यात आलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्गही मालवणपासून जवळच आहे. शत्रूच्या उरात धडकी भरवणारा हा जलदुर्ग आजही अरबी समुद्राच्या लाटांचा सामना करत निकराने उभा आहे. वेंगुर्ल्याहून जवळच शिरोडा हे गाव आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकरांचे हे गाव. येथील समुद्रकिनार्‍यावर फेरफटका मारताना खेड्याभोवती पसरलेले मिठागरांचे दृश्य म्हणजे जणू पांढरा समुद्र समोर पसरल्यासारखे वाटते. कोकणात पर्यटनास गेल्यास कोकणी पदार्थाची लज्जत अनुभवल्याशिवाय परतणार्‍याची गणना अरसिकातच होईल. तारकर्लीत खास कोकणी रेस्टॉरंट आहे. दोन-तीन दिवस भटकायचे झाल्यास महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने निवासाची व्यवस्थाही येथे केली आहे. कसे पोहचाल : तारकर्लीचे मुंबईपासून अंतर आहे साडेपाचशे किलोमीटर. कोकण रेल्वेने येथे पोहचायचे झाल्यास कुडाळ स्टेशन येथून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. शिरोडा बीच वेंगुर्ल्याहून एकोणीस किलोमीटरवर आहे. कोल्हापूरमार्गेही जाता येते. कोल्हापूरहून तारकर्ली साधारणत: दीडशे किलोमीटरवर आहे. पुणे, कोल्हापूऱ, मुंबईहून मालवणसाठी बस आहेत. मालवणहून तार्कालीसाठी गाड्या आहेत. मालवण रत्नागिरीपासून दोनशे किलोमीटरवर आहे.

Monday, October 27, 2008

साहसी ट्रेकर्स व पक्षीनिरिक्षकांचे नंदनवन



रायगडमधील पनवेल नजीकचा पातळगंगा नदिच्या परिसरातील साडेचार किलोमीटरच्या वनश्रीने नटलेल्या परिसरात कर्नाळा पक्षी अभयारण्य पसरले आहे. कर्नाळा उन्हाळ्यातले काही दिवस वगळता तीन्ही ऋतूत आनंद देते. पावसळ्यात येथील जोरात कोसळणार्‍या पावसांत चिंब भिजत भटकायचं, हिवाळ्यात वनराईने नटलेल्या जंगलात मूक्तपणे भटकत पक्षीनिरिक्षणाचा आनंद लुटायचा. हिवाळ्यात येथे जगभरातून स्थलांतरीत पक्षी वास्तव्यास येतात व ‍पक्षीनिरिक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात. कर्नाळा अभयारण्यात पक्षांच्या जवळपास दिडशे प्रजाती आढळतात. कर्नाळ्याच्या जंगलातून भटकंती अवर्णनीय आनंद देते. देश-परदेशातील पक्षीवैभव आपल्या मधुर सुरावटींनी आपली भ्रमंती अधिकच सुखावह बनवतात. स्थानीक व स्थलांतरीत पक्षांच्या वास्तव्यानुसार पक्षीनिरिक्षणाचे दोन कालावधी पडतात. परदेशी पाहूणा असणार्‍या ड्रॉगो पक्षाचे हवेत विहरण्याचे व इतर पक्षांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल काढण्यातील प्राविण्य तर वाखाणण्याजोगेच आहे. कर्नाळा प‍क्षीअभयरण्यात मुंबई, ठाणे व सभोवतालच्या पर्यटकांची रीघ लागलेली असते. दरवर्षी साधारणत: लाखभर पर्यटक कर्नाळ्याची वाट धरतात. पक्षी निरिक्षकांसोबतच ट्रेकससही मोठ्या उत्साहाने येथील वातावरणात अंगभूत कौशल्य व जिज्ञासू वृत्तीचे दर्शन घडवत असतात.

कर्नाळा किल्ल्यावरील पस्तीस मीटरचा सुळका ह्या परिसराची ओळख आहे. साहसी ट्रेकर्सना तो साद घालत असतो. दुरवरून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा येथील सुळका ट्रेकर्संच्या साहसाची परिक्षा घेते. कर्नाळा किल्ल्याने मराठा, पोतूर्गिजांसहित सर्वच राजवटीं पाहिल्यात. कर्नाळा किल्ल्याचा इतिहास बाराव्या शतकापर्यंत पोहचतो. मराठ्यांपासून, मोघल व इंग्रजांपर्यंत सर्वच राजवटी त्याने अनुभवल्या. संपूर्ण परिसर भरगच्च झाडीने व्यापलेला आहे.
वृक्षराजींनी समृद्ध जंगलात कोशींब, आंबा, कळम, उंबर यासारखी वृक्षवल्ली आहेत. किल्ल्यावर चढण्यातील अनुभव अद्वितीय असतो. किर्र झाडीतून वाट काढत किल्ल्याची चढण चढण्याची कसरत भर हिवाळ्यातही अंगातून घाम काढते. कर्नाळ्यात राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. वनखात्याने दोन विश्रामगृह आपल्या सेवेत आहेत. त्यासाठी फक्त अगोदर फॉरेस्ट कार्यालयाशी संपर्क साधून आरक्षण करावे लागेल. निसर्गात भटकण्याच्या आवडीसोबतच साहसी ट्रेकर्स व पक्षीनि‍रीक्षणाची आवड जोपासणार्‍या जिज्ञासू पर्यटकांसाठी हे नंदनवनच आहे.

भेट देण्याची वेळ : ऑक्टोबर ते एप्रिल

जाण्याचा मार्ग : कर्नाळ्यास हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येथे पोहचता येते. येथून साधारणत: तीस किलोमीटरवर मुंबई विमानतळ आहे. रेल्वेने जायचे झाल्यास कोंकण रेल्वेने पनवेलला पोहचायचे. पनवेल अगदी जवळ म्हणजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने अगदी सहजरित्या येथे पोहचता येते.

नाशिक - देवळांचे शहर

स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या महान व्यक्तिमत्वांची भूमी म्हणजे नाशिक. हे शहर देवळांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक काळापासून नाशिकला धार्मिक स्थळ म्हणून महात्म्य प्राप्त झाले आहे. देशात चार ठिकाणी कुंभमेळा भरतो, त्यापैकी दक्षिण भारतात नाशिक व त्र्यंबकेश्वर ही ठिकाणे आहेत.दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट पाहण्यासारखे आहेत.
येथील प्रसिध्द ठिकाणे- ‍
1. त्र्यंबकेश्वर हे बारा जोतिर्लिंगांपैकी एक आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात ते वसले आहे. मुख्य ज्योतिर्लिंगाचे मंदिर पहाण्यासारखे आहे. त्याच्या चारही बाजूंनी कोट आहे. पूर्वेला मुख्या दरवाजा आहे. ब्रम्हा, विष्णू व महेशाची तीन लिंगे हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराजवळच कुशावर्त तीर्थ हे कुंड आहे. मंदिरालालागूनच अहिल्या नदी वाहते. ब्रम्हगिरी पर्वतावरच गंगाद्वार हे ठिकाण आहे. येथे गोदावरी उगम पावते. त्याच्यावर ब्रम्हगिरीला जाण्याचा रस्ता आहे. तेथे भगवान शंकरांनी जटा आपटल्याच्या खूणा असल्याचे सांगितले जाते. त्र्यंबकेश्वर वारकरी भक्तांसाठीही महत्त्वाचे टिकाण आहे. कारण ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथांना येथेच गहिनीनातांचा अनुग्रह झाला होता. त्यांची समाधीही येथेच आहे. तेथे मोठा उत्सवही साजरा होतो. शिवाय कुंभमेळ्यात सहभागी होणार्‍या तेरा पैकी दहा आखाड्यांचे आश्रम येथे आहेत. त्र्यंबकेश्वरात बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारी तर लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील सोमवारी ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारण्याची परंपरा आहे. विशेषतः तिसर्‍या सोमवारी त्यासाठी मोठी गर्दी असते. हे स्थळ नाशिकपासून २७ किलोमीटरवर आहे.

2. पंचवटी- त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेली गोदावरी नदी नाशिकमधून वाहते. या नदीमुळे नाशिकचे दोन भाग पडले आहेत. नदीच्या पलिकडील भागाला पंचवटी म्हणतात. पंचवटी भागातच रामाचे वास्तव् होते असे मानले जाते. येथे असलेल्या पाच वडांच्या झाडांवरून या भागाचे नाव पंचवटी पडले. प्रसिद्ध काळाराम मंदिर पंचवटीतच आहे. याशिवाय इतर अनेक मंदिरे येथे आहेत. पंचवटीतच सीता गुंफा आहे. या गुहेत सीता काही काळ राहिली होती, असे म्हणतात. गुहेत जायला फार छोटा रस्ता आहे. आतमध्ये राम लक्ष्मण व सीतेची मूर्ती आहे. येथूनच रावणाने सीतेचे अपहरण केल्याचे मानले जाते.

३. रामकुंड- पंचवटीतील हे सर्वात महत्वाचे ठिकाण. पंचवटीतील वास्तव्यात श्रीराम स्नानासाठी येथे येत असल्याचे सांगितले जाते. याच ठिकाणी पिता दशरथाच्या अस्थींचे विसर्जन रामाने केले. येथे अस्थिविलय कुंड आहे. तेथे विसर्जित केलेल्या अस्थी वाहून न जाता वितळतात, अशी श्रद्धा आहे. जवळच गांधी तलाव आहे. या तलाव तसेच स्मारक आहे. महात्मा गांधीच्या अस्थी येथे विसर्जित केल्या हो्त्या. सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नान याच कुंडात होत असते.

४. काळाराम व इतर मंदिरे पेशव्यांच्य काळात त्यांचे सरदार रंगवराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडापासून बनले आहे. त्याच्याभोवती दगडी कोट असून तो १७ फूट उंच आहे. मंदिरात आत ओवर्‍या आहेत. मंदिरासमोर भव्य सभामंडप आहे. मंदिरात राम सीता व लक्ष्मण यांच्या २-२ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. हे मंदिर बांधण्यास १७७८ साली सुरवात करण्यात आली होती. त्यासाठी जवळच्या रामशेज डोंगरावरून काळा दगड आणण्यात आला. हे मंदिर बांधायला तेवीस लाख रूपये खर्च आला होता. दोन हजार कामगार बारा वर्षे काम करत होते. दलितांना या मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. तो बरीच वर्षे चालला होता. काळारामाव्यतिरिक्त अनेक ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व लाभलेली मंदिरे या परिसरात आहेत. आकर्षक कलाकुसरीसाठी नारोशंकर मंदिर प्रसिद्ध आहे. पेशव्यांनी वसईच्या युद्धात विजय मिळाल्यानंतर काढून आणलेली घंटा याच मंदिरात बसवली आहे. याशिवाय नंदी नसलेली कपालेश्वर मंदिर आहे. प्राचीन सुंदरनारायण मंदिर आहे.

५. तपोवनपंचवटीतच गोदावरी व नंदिनी या नद्यांच्या संगमावर तपोवन हे ठिकाण आहे. तपोवन म्हणजे तप करण्याची जागा. पूर्वीच्या काळी या भागात दोन नद्यांच्या संगमामुळे हिरवळ होती. अतिशय प्रसन्न व मनोहारी वातावरणात साधू तपश्चर्येसाठी येथे येत असत. रामायणकाळात लक्ष्मण येथे येत असे. त्याने शूर्पणखेचे नाक कापण्याचा प्रसंग येथे घडला असे मानले जाते. या भागात काही गुहासुद्धा आहेत. नैसर्गिक सौंदर्यामुळे आजही पर्यटकांची येथे गर्दी असते. येथे हनुमान व लक्ष्मण यांची मंदिरेही आहेत.

6. अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थान मानले जाणारे अंजनेरी नाशिकपासून २० किलोमीटरवर आहे. या पर्वतावर जैनांची लेणीसुद्धा आहेत. गिर्यारोहणासाठी येथे असलेले सुळके प्रसिद्ध आहेत. गिर्यारोहक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच हे ठिकाण आहे. मंदिर डोंगरावर आहे.

7. वणी- देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी वणी येथील जगदंबा देवी आहे. सप्तश्रंृग डोंगरावर हे स्थान आहे. डोंगरावर गेल्यानंतर तेथून नऊशे पायर्‍या चढून गेल्यानंर देवळात जाता येते. डोंगरातच देवीची मूर्ती कोरलेली आहे. अठराभूजा असलेली मूर्ती देखणी आहे. नवरात्र व चैत्रात येथे मोठी यात्रा भरते. ही देवी अनेकांची कुलदेवता आहे. त्यामुळे या काळात मोठी गर्दी असते. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर येथे भक्त येतात. अनेक भक्त आपल्या गावापासून कावडी भरून आणतात. हे ठिकाण नाशिकपासून ५२.२७ किलोमीटरवर आहे.

8.बौद्धलेणी नाशिक मुंबई रस्त्यावर नाशिकपासून आठ किलोमीटरवर बौद्धलेणी आहेत. (ज्याला स्थानिक भाषेत पांडवलेणी म्हणतात.) पहिल्या वा दुसर्‍या शतकात ती बांधली असल्याचे मानले जाते. या लेण्यांच्या पायथ्याशी बुद्धविहार बांधण्यात आले आहे.

9.फाळके स्मारक- चित्रमहर्षी दादासाहेब फाळके नाशिकचेच. नाशिकमध्येच त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे देखणे स्मारक पांडवलेण्याच्या पायथ्याशी उभारण्यात आले आहे.

१०. जिल्ह्यातील स्थळे नाशिकपासून तीस किलोमीटरवर असलेल्या सिन्नर येथील प्राचीन गोंदेश्वर मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. येवला हे शहर पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय १८५७च्या युद्धात पराक्रम गाजविणारे तात्या टोपे येवल्याचेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी त्याच धर्मात मरणार नाही ही घोषणा येवला येथेच केली. मालेगावजवळील झोडगे येथील गावी असलेले शिवमंदिर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. इगतपुरीजवळील टाकेद हे ठिकाण पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. सीतेला पळवून नेणार्‍या रावणाशी युद्ध करून याच ठिकाणी जटायू पक्षी निपचित पडला होता. त्याच्या स्मृत्यर्थ येथे जटायू मंदिरही आहे. इगतपुरी येथे सत्यनारायण गोयंका यांनी उभारलेले विपश्यना केंद्र आहे. तेथे जगभरातून लोक येतात. चांदवड येथील रेणुका देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत अनेक गिर्यारोहणासाठी योग्य अशी ठिकाणे आहेत. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर नाशिकहून घोटीमार्गे जाण्यास जवळ आहे. शिवाय राज्यातील सर्वांत उच्च किल्ला म्हणून गणला जाणारा साल्हेरचा किल्लाही जिल्ह्यातच आहे.जाण्याचा मार्ग ः नाशिकला राज्यातील सर्व शहरातून येण्यास बस आहेत. शिवाय नाशिक रेल्वेमार्गावरही आहे. पुण्यापासून नाशिक २१० तर मुंबईपासून २३० किलोमीटर आहे.

मुरूड-जंजिरा : अजिंक्य किल्ला

रायगड जिल्हातील मुरूड तालूक्यातील हा किल्ला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. शिवाजी महाराजांपासून कोणत्याही राजाला हा किल्ला जिंकता आलेला नाही. कोकण किनारयाला लागूनच अलिबागपासून अंदाजे 45 किलोमीटरवर हा किल्ला आहे. किनारयापासून दोन किलोमीटरवर समुद्रात जंजिरा किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीच्या सहाय्याने जावे लागते. त्याची तटबंदी अजूनही भक्कम आहे. किल्ल्याला 14 बुरूज आहेत. प्रत्येक बुरूजावर मोठी तोफ आहे. आतमध्ये बरीच पडझड झाली आहे. गोड्या पाण्याचे दोन तलाव आहेत. पीर पंचायत सुरूलखानाचा वाडा पाहण्यासारखा आहे.
मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्‍यावरील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. किनार्‍यावर सर्वत्र नारळाची झाडे पसरलेली आहेत. मुरूड लहान असले तरी येथील नबाबाचा वाडा पाहण्यासारखा आहे. तो मोडकळीस आला असला तरी त्याची भव्यता कायम आहे. जंजिरा किल्ल्याच्या जवळच पाच किलोमीटरवर पद्मदुर्ग आहे. तो शिवरायांनी बांधला. सिंध्दुदुर्ग जिंकता यावा म्हणून या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. हा किल्लाही पाहण्यासारखा आहे. एकंदरीत मुरूड जंजिरा व पद्मदुर्ग हे वीकएंड आनंदी घालवण्याचे चांगले ठिकाण आहे.
जाण्याचा मार्ग ः पुण्यापासून 150 किलोमीटरवर हा किल्ला आहे

घ्रिश्णेश्वर

औरंगाबादहून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे जोर्तिलींग फार पूरातन काळतले म्हणजे जवळपास पहिल्या दशकातले आहे. जवळच दौलताबानचा किल्ला व अजठा-वेरूळ असल्यामुळे येथे मोठ्याप्रमाणावर पर्यटक येतात. अहिल्याबाई होळकर यांनी येथे देऊळ बांधले. अ‍‍‍हिल्याबाई यांनी बनारस येथील काशी विश्वेश्वर व गया येथील विष्णु पंडा येथेही देऊळ बांधले. या जोतिर्लिगा बाबतीत असे सा‍गितले जाते की कुसूमा नावाची एक स्त्री ‍शंकराची मनोभावे पुजा करत असे. ‍ती शिवलींग एका टाकीत पाण्यात बुडवून काढत असत तीच्या नवरयाची पहिल्या बायकोला ते पाहवत नाही. ती कुसूमच्या मुलाला ठार करते. दु:खी झालेली कुसूम तरीपण शिवलीगांची पुजा करत असते. जेव्हा ती शिवलींग पाण्यात बुडवते व वर काढते तेव्हा तिचा मुलगा आर्श्चयकारक रित्या जिवंत होतो. त्यामुळे येथे शिवलींगाला घ्रिश्णेश्वर म्हणतात.

सैर प्राणी पक्ष्यांच्या देशातली... पेंच राष्ट्रीय उद्यान


सातपुडा पर्वरांगेच्या दक्षिण पायथ्याशी असलेले पेंच राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेस समांतर पसरलेला आहे. अडीचशे चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जंगल क्षेत्रात त्याची व्याप्ती आहे. एकोणविसशे पंचाहत्तर साली अस्तित्वात आलेलं हे अभयारण्य महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारचा संयुक्त उपक्रम आहे. पेंच नदीने त्याची उत्तर-दक्षिण अशी विभागणी झालेली आहे. उत्तर भाग आपल्याकडे तर दक्षिण भाग मध्यप्रदेशात. सातपुड्यातून उगम पावून पेंच नदी या राष्ट्रीय उद्यानातून वाहत वृक्षवेली व वन्यजीवांना आपल्या अमृतधारेने तृप्त करते. जैवविविधतेने समृद्ध भाग नद्या, खोरे, व उंच-सखल पर्वतरांगांनी सजलेला आहे. यामुळे येथे प्राणी, पक्षी व जैववनस्पतींची मुक्त उधळणं झाली आहे. येथील अद्वितीय सृष्टीसौंदर्याने साहित्यिकांनाही आपली
लेखनी उचलून सृष्टीच्या अविष्कारास शब्दांचे बळ दिले आहे.

कालिदासासही येथील मनमोहक सृष्टीसौंदर्याने भुरळ घातली आहे. 'मेघदुतम' व 'शाकुंतल' या महाकाव्यातही येथील सौंदर्याचे रसभरित वर्णने आली आहेत. निळ्या आभाळाच्या कॅनव्हासखाली येथील विस्तीर्ण परसलेले गवताचे पट्टे, दाट झाडी, झुडपं व पर्वताची आकाशाला भिडणारी उंच सुळके विधात्याने रेखाटलेल्या कल्पनेतील चित्राप्रमाणे भासतात.
चार विविध वनक्षेत्रांचा संयोग झालेल्या या राष्ट्रीय उद्यानात 33 प्रकारची प्राणीसंपदा, पक्षांच्या एकशे चौसष्ट जाती, तीस प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळून येतात. सातपुड्रयाच्या पायथ्याशी परसलेल्या या उद्यान प्रदेशात वाघ, चितळ, अस्वल, जंगली कुत्रे, हरिण, काळवीट, कोल्हे, नीलगाय, माकड यासारखी समृद्ध प्राणीसंपदा वास्तव्य करते. माशांच्या जवळपास पन्नास प्रजाती येथे आढळतात. येथील पक्षीजीवनही तेवढेच समृद्ध. आपल्याकडील पक्षांसोबतच सातासमुद्रापार करून आलेले स्थलांतरित पक्षांच्याही विविध जाती येथे बघायला मिळतात. पेंचला भेट दिल्यास समृद्ध प्राणीजीवन, पक्षी विविधता, अप्रतिम र्नै‍सगिक सौंदर्याची विधात्याने केलेली उधळणं अनुभवून आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याच्या स्मृती कायम रेंगाळत राहतील याची खात्री आहे.

जाण्याचा मार्ग : पेंच राष्ट्रीय उद्यानास भेट द्यायला आपणासाठी विमान, रेल्वे व रस्ते वाहतूक व्यवस्था सज्ज आहे. नागपूर विमानतळ येथून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास जवळचे स्टेशन आहे नागपूर. बसने जायचे झाल्यास रामटेक जवळ करावे लागेल. येथून नियमित बससेवा उपलब्ध आहे. पेंच राष्ट्रीय उद्यानापासून नागपूरचे अंतर आहे जवळपास 65 किलोमीटर.

शिवकालाचे स्मरण : सिंहगड

पुण्यात येऊन सिंहगड बघितला नाही असे होत नाही. पुण्यापासून २० किलोमीटर असणारा सिंहगड समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंचीवर आहे. सिंहगड पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता. मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला आपल्या ताब्यात यावा ही शिवाजी महाराजांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी बालपणीचे सवंगडी तानाजी मालुसरे व शेलारमामा यांच्यावर कोंढाणा मोगलांच्या ताब्यातून घेण्याची जबाबदारी सोपवली. १६७० साली तानाजीने निवडक मावळ्यांसह गडावर आक्रमण केले. घनघोर युध्दानंतर मावळ्यांनी तो किल्ला जिंकला, मात्र या युध्दात तानाजी शहीद झाला. ही बातमी महाराजांना कळाली तेव्हा ते म्हणाले, की गड आला पण सिंह गेला.यावरुन नंतर त्या किल्ल्याचे नाव सिंहगड पडले.
सिंहगडावर आता थेट गाडी जाते. मात्र, पायथ्यापासून पायवाटेने गडावर जाण्यात खरी मजा आहे. गडावर पोहोचल्यावर प्रथम पुणे दरवाजा लागतो. सिंहगडावर तानाजी मालूलुरे व शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम यांची समाधी आहे.सिंहगडावर गेलात आणि देव टाकीचे पाणी न पिताच परतलात असे होत नाही. थंडगार व शुध्द पाण्यासाठी ही टाकी प्रसिध्द आहे. येथील पिठले भाकर, मटक्यातील दही व कांदाभजी खाण्याची मजा काही और आहे गडावरुन लवकर निघाल्यास परतताना वाटेत खडकवासला धरणात पोहण्याचा आनंदही घेता येईल.
जाण्याचा मार्ग ःसिंहगडावर जाण्यासाठी पुण्यातून स्वारगेटवरुन भरपूर गाड्‌या आहेत. पायथ्यापर्यंत पीएमटीची बसही जाते. तेथून एक तर पायवाटेने किवा खाजगी जीपने आपण गडावर जाऊ शकतो.

तारकर्ली बीच - हिरव्यागार सौदर्याने नटलेला ‍समुद्रकिनारा

विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते.
बाधा व्हावी असे सौंदर्य निसर्गाने येथे उधळले आहे. येथे थांबून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्ट आपल्या सेवेत हजर आहेत. येथील समुद्र किनारे एवढे नितळ, स्वच्छ आहेत की पाण्यातील सौदर्य अगदी साध्या डोळ्यांनी न्याहाळता येते. निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवतो. मनाला शांतावतो. गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे.
जाण्याचा मार्ग ः मालवणपासून तारकर्ली केवळ सहा किलोमीटर आहे. पुणे, कोल्हापूर, मालवण येथून बसची व्यवस्था आहे. मुंबईपासून साडेपाचशे तर कोल्हापूरपासून हे ठिकाण दीडशे किलोमीटरवर आहे.तारकार्लीसाठी जवळचे रेल्वे स्टेशन आहे कुडाळ. तेथून येथे येण्यासाठी बस उपलब्ध असतात. तारकर्लीला विमानाने जाण्यासाठी गोव्यातील डाबोलीम हे जवळचे विमानतळ आहे.

शिवनेरी - शिवरायांचे आठवावे रूप

पुण्यापासुन नव्वद किलोमीटरवरील शिवनेरी गडाला मोठे ऐतिहासिक महत्व आहे. शिवाजी महाराजांचा जन्म याच गडावर झाला. महाराजांचे बालपण येथेच गेले. स्वराज्याचे बाळकडू त्यांना याच गडावर मिळाले. त्या काळात हा किल्ला सर करणे अवघड होते. त्यामुळेच शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांनी शिवरायांच्या जन्मापूर्वी जिजाबाईंना शिवनेरी येथे पाठविले होते. गडावर शिवाई देवीचे देऊळ आहे. त्यावरूनच शिवाजी हे नाव ठेवण्यात आले.गडावर जाण्यासाठी आता रस्ता आहे. जाताना सात कमानी लागतात. शिवाईचे देऊळ, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, डोंगरमाथा, कडेलोट टोक, अंबरखाना पाहण्यासारखे आहे. गडाजवळ नाना घाट लागतो त्यावरून कोकण पठाराचे मोहक दृष्य दिसते. जीवधन नावाचा आणखी एक गड या गडापासून जवळच आहे.

महाबळेश्वर - महाराष्ट्राचे काश्मीर

महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सातारा‍ जिल्हयात महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा लौकिक आहे. महाबळेश्वर इंग्रजांच्या काळात मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी होते. येथे सुमारे 30 ठिकाणे बघण्यासारखी आहेत.एलफिस्टन पॉईट, विल्सन पॉईंट, आर्थर पाईंट, लॉडनिंग पॉईंट, माजोरी पॉईंट नाथकोट, बॉंम्बे पाईंट, सावित्री पाईंट कर्निक पाईंट फाकलेड पॉईंट हे काही पॉईंट प्रसिद्ध आहेत. या पॉईंटवर जाऊन सूर्यास्त पाहण्याची मजा काही वेगळीच.महाबळेश्वरचे पठार जवळपास 150 किलोमीटरमध्ये व्यापले आहे. समुद्रसपाटीपासून ते 4710 फुट उंचीवर आहे. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. महाबळेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणूनही प्रसिध्द आहे. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला तो प्रतापगड येथून जवळ आहे. पाचगणी हे आणखी एक थंड हवेचे ठिकाणही पाहण्यासारखे असून तेही येथून जवळ आहे. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीही जगप्रसिध्द आहे. थंडीत स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद काही औरच आहे. जाण्याचा मार्ग - महाबळेश्वर पुण्यापासून 120, मुंबईहून 247 औरंगाबादहून 348 तर पणजी पासून 430 किलोमीटरवर आहे.

लोणार विवर


लोणार हे उल्कापाताने नैसर्गिकरीत्या तयार झालेलं जगातील तिसर्‍या क्रमांकाचं विवर (Crater) आहे. विवर म्हणजे मोठ्या आकाराचे प्रचंड खोल असे निसर्ग निर्मित सरोवर. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी अठराशे तेवीस मध्ये या विवराचा शोध लावला. आईना-ए-अकबरी, पद्मा पुराण व स्कंध पुराणासारख्या प्राचीन ग्रथातही विवराचा संदर्भ सापडतो. बेसॉल्ट खडकामध्ये म्हणजे काळ्या दगडात आकार घेतलेलं लोणार विवर हे जगातील एकमेव विवर आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे ते आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्वस नव्वद किलोमीटरवर लोणार आहे. गावाच्या सीमेवरच हे विवर आहे. त्याचा व्यास आहे अठराशे तीस मीटर आणि खोली एकशे पन्नास मीटर. सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी कोसळलेल्या एका प्रचंड अशनीमुळे म्हणजेच एका मोठ्या उल्कापातामुळे येथील काळ्या खडकात हे प्रचंड आकाराचे विवर निर्माण झाले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या विवराचा वरचा भाग वर्तुळाकार असून त्याचा परिघ सहा किलोमीटर इतका आहे. विवरात मधोमध वर्तुळाकार भागात पांच ते सहा मीटर खोलीचे खारे पाणी असून तळ्याचा परिघ अंदाजे चार किलोमीटर आहे.

विवराच्या कडा सत्तर ते ऐंशी अंशाच्या उतारात असून त्यावर वृक्षराजीचे आच्छादन आहे.तलावा काठी बाराव्या आणि तेराव्या शतकातील मंदिरे आहेत. सरोवराच्या बाहेरील बाजूस स्वच्छ पाण्याची अखंड वाहणारा झरा असून त्याचा उगम गंगेपासून झाल्याचे मानण्यात येते. या धार मंदिर समूहात बारमाही गोड्या पाण्याची धार पडत असते. या‍शिवाय सीता वाहिनी व रामगया असे दोन झरे आहेत. लोणार सरोवराचे पाणी मात्र खारट आहे. तेही समुद्राच्या पाण्याच्या सातपट खारट! त्यात क्लोराईड आणि फ्लुरॉईडसचे प्रमाण जास्त आहे. परिसरातील क्षार वाहून तळ्यात जमा होतात. हजारो वर्षे एकाच ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे या पाण्याला तीव्र खारटपणा आला असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे. असं म्हणतात की, निजामाच्या काळात या पाण्यापासून मीठ तयार करून ते विकले जात असे. तसेच हे पाणी साबण तथा काच कारखान्यातही वापरले जात असे. अशाप्रकारच्या जुन्या नोंदी अभ्यासकांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत. गंमत म्हणजे दगडी तलावातील हे पाणी मुरायला मार्ग नाही. उन्हाच्या तापमानाने पाण्याची वाफ होऊन कमी होईल तेवढाच पाण्याचा र्‍हास. लागुनच वन्य जीव अभयारण्य आहे. ते 384 हेक्टर क्षेत्रात पररले अहे. या परिसरात सुमारे पंचाहत्तर जातींचे पक्षी असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. मोर, नीलकंठ, घुबड, बगळे, पारवे, ससाणा, करकोचा इत्यादी पक्षांचा येथे मूक्त वावर असतो. याशिवाय चिंकारा, लांडगा, तडस, कोल्हा, घोरपड, मुंगुस, माकडे, साप, खार, ससा इत्यादी समृद्ध प्राणीसंपदा आहे. माकडे तर सर्वत्र दिसतात. विभिन्न प्रकारची वृक्षवल्लीही आहे.दंतकथेनुसार भगवान विष्णूने लोणार येथे लोणासुरावर विजय मिळविला होता. त्यामुळे लोणार नांव प्रचलित झाले. येथे दैत्य सूदनाचे प्राचीन व सुंदर मंदिर आहे. यादवकालीन हेमांडपंथी वास्तुशिल्पाचा तो उत्कृष्ट नमुना आहे.
लोणार सरोवरापासून काही अंतरावर अंबर तळे असून तेही उल्कापातानेच निर्माण झाल्याचे सांगितले जाते. या तळ्याजवळ हनुमान मंदिर आहे. लोणार सामान्य पर्यटकाशिवाय जगभरातल्या वैज्ञानिकांना आकर्षित करते. देश परदेशातल्या संशोधन संस्था व विद्यापीठांनी येथे सखोल भूशास्त्रीय अभ्यास केला आहे. अर्थातच लोणार परिसराचे हे वैज्ञानिक, ऐतिहासिक, आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांचे जतन करणे आवश्यक आहे.राहण्याची व्यवस्था : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचे रिसॉर्ट पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज आहे. यात डॉरमेटरी, अत्याधुनिक भोजन कक्ष, राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या उपलब्ध आहेत.

जाण्याचा मार्ग : लोणार विमान, रेल्वे व रस्त्यांनी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. विमानाने जायचे झाल्यास जवळचे विमानतळ आहे औरंगाबाद. औरंगाबादचे येथून अंतर आहे सव्वाशे किलोमीटर. रेल्वेने जायचे झाल्यास मलकापूर गाठावे लागेल. मलकापूर मुंबई-भूसावळे रेल्वे मार्गावर आहे. औरंगाबाद, मेहकर, जालना, बुलढाणा येथून बससेवा उपलब्ध आहे. मुंबईपासून लोणार जवळपास सहाशे किलोमीटरवर आहे.

कोकणातील निसर्गरम्य अंबोलीची सैर



कोकण किनारपट्टीच्या भूप्रदेशात विधात्याने सृष्टीसौदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धरती व आकाशास कवेत घेऊ पाहणारा विशाल सह्याद्री व अरबी समुद्रादरम्यान पसरलेला हा चिंचोळा भूप्रदेश म्हणजे नंदनवन आहे. भौगोलिक वैशिष्ट्यामुळे कोकणास निळ्याशार समुद्र किनार्‍यासोबतच थंड हवेची ठिकाणेही लाभली आहेत. सावंतवाडीपासून जवळच समुद्रसपाटीपासून साडेसहाशे मीटर उंचीवर असलेले अंबोली हे त्यापैकीच एक. अंबोली घाटाचा सुंदर व रम्य परिसर घनदाट अरण्य व समुद्राने वेढलेला आहे. तिन्ही ऋतूत सृष्टीच्या विविध रूपांचा साक्षात्कार घडवून पर्यटक व निसर्गप्रेमींना आनंद देणार्‍या मोजक्या ठिकाणात अंबोलीचा समावेश करता येईल. सह्याद्रीचे कडे ढगांना आग्रहाने थांबवत असल्याने येथे विक्रमी पाऊस कोसळतो. परिणामी पावसाळ्यात येथील दर्‍याखोर्‍यातून सगळीकडे शुभ्र तुषार उडवत धबधबे कोसळताना दिसतात. पर्यटक व तरूणाई धबधब्यांमध्ये चिंब भिजण्याचा आनंद अनुभवतात. हिरवेगार डोंगर, वाहणारे निर्झर व धबधब्यांमुळे निर्माण होणारे चैतन्य पर्यटकांना साद घालतात. उन्हाळ्यातही येथील वातावरण आल्हाददायक असते. सावंतवाडीकडून अंबोलीकडे कूच करतानाच येथील निसर्गसौदर्याची साक्ष पटते. शिवाय जैवविविधतेचा शालू पांघरलेल्या हिरव्यागार टेकड्यांची अभ्यासकांनाही भूल पडते.
हिवाळ्यातही येथील दर्‍याखोर्‍यातून मुक्तपणे भटकत सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यातील आनंद निव्वळ अवर्णनीय. महादेवगड, मनोहरगड, श्रीरगावंकर पॉईंट या कड्यांवरून विस्तीर्ण पसरलेल्या दर्‍याखोर्‍या पाहताना विलोभनीय आनंद मिळतो. सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य तर अक्षरशः वेड़ लावते. क्षितिजास नारंगी, लाल व गुलाबी रंगछटांची आभा देत सूर्य अस्ताला जातो.निसर्गप्रेमीशिवाय साहसी व अभ्यासू पर्यटकांनाही अंबोली निराश करत नाही. ह्या भागास धार्मिक महात्म्यही लाभले आहे. हिरण्यकेशी ह्या भगवान ‍शंकराच्या पवि‍त्र स्थानी महाशिवरात्रीस हजारो भाविक भेट देतात. येथून हिरण्यकेशी नदी उगम पावून संपूर्ण परिसरास हिरवाईचे लेणे देते. येथील नदीच्या खोर्‍यात भटकत तासनतांस मासेमारीचा आनंदही अनुभवता येतो. शिवलिंगास लागून साहसी पर्यटकांना आव्हान देणारी तीनशे मीटर रूंदीची गुहाही येथे आहे.

अंगावर शहारे आणणारा काळोख, चावणारे डास, रक्त शोषणाऱ्या जळवा व जीव गुदमरवणारी कोदंट हवा यासारखी आव्हाने झेलून मार्ग काढावा लागतो. गुफेत सात डबकी आहेत. शेवटच्या डबक्यात सूर्याचे दर्शन घडते. हेही एक आश्चर्यच. मात्र, त्या उजेडाच्या रहस्यावर अद्यापपर्यंत रहस्याचे आवरण आहे. अंबोलीत ऐतिहासिक व समृद्ध बॉटॅनिकल गार्डनही आहे. मित्र किंवा कुटुंबीयांसोबत मुक्तपणे येथील जंगलात भटकत जैवविवधतेच्या निरीक्षणाचा अनुभवही अतुलनीय आहे. भटकंतीमुळे थकल्यावर वनभोजन घेऊन ही भेट अविस्मरणीय करता येते. येथे राहण्याचीही सोय आहे. विविध हॉटेल्स आहेत. शिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रहायची सोयही आहे.

जाण्याचा मार्ग : मुंबईपासून अंबोली घाटाचे अंतर सुमारे साडेपाचशे किलोमीटर आहे. मुंबईहून येथे बस व रेल्वेनेही पोहचता येते. सावंतवाडीहून अंबोली अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. कोकण रेल्वेने आपणांस सावंतवाडीस पोहचता येते. कोल्हापूरहून हे ठिकाण चार तासांच्या अंतरावर आहे.

आठशे वर्षांचा इतिहास - 'किल्ले विजयदुर्ग'


विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन 1993 ते 1206 या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर 16 किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. सन 1200 मध्ये तो बांधला गेला असावा असा अंदाज आहे.इ.स. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. 1218 मध्ये बुडविले. इ.स. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स. 1431 मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. 1490 ते 1526 या काळात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर 1653 पर्यंत सुमारे 129 वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 साली हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महरांजानी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा साधारण 5 एकर क्षेत्रात हा किल्ला विखुरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती व व्याप्ती केली. 14 एकर 5 गुंठे इतक्या क्षेत्रापर्यंत या किल्ल्याची व्याप्ती वाढविली. पूर्वेच्या बाजूला नवीन तटबंदी उभारली.

किल्ला कसा पहाल- किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी. मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्‍या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर 30 मिटर उंचीची तटबंदी. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता, त्यास दिंडी दरवाजा म्हणत. रात्रौ मुख्य दरवाजा न उघडता त्याचा जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत. डाव्या बाजूला खलबतखाना नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये सभा बैठका होत. या इमारतीचच्या समोर दारु-गोळ्याचे कोठार आहे. पुढे गेल्यावर भुयार दिसते. भुयाराच्या बाजूने तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या किल्ल्यास विविध नावाचे 18 बुरूज आहेत. तटावरुन चालतांना बारकाईने पाहिल्यास तटाखालील कोठारे दिसून येतात. कांही अंतर चालून गेल्यावर लाईट हाऊस दिसते. लाईट हाऊसच्या पुढे तटाच्याखाली चुन्याचा घाणा दिसतो. तटाते बांधकाम करतांना दगडामध्ये सांधण्यासाठी वापरावयाचे सिमेंट मिश्रण म्हणून चुना, रेती, गुळ, हरड्याचे पाणी व नारळाचा काथा या घाण्यामध्ये मिश्रण करुन सिमेंट बनवत. चुन्याचा घाण्याच्या बाजूला गोड्या पाण्याच्या विहिरी, साहेबाचे ओटे, भवानी मातेचे मंदिर, जुने रेस्ट हाऊस, जखीणीची तोफ यासारख्या गोष्टी येथे पहावयास मिळतात

कृष्णेच्या खोर्‍यातून वन्यजीवदर्शन



सागरेश्वर अभयारण्य हे कृष्णेच्या खोर्‍यातील संपूर्णतया मानवनिर्मित अभयारण्य असून सांगली जिल्ह्यातील खानापूर, वाळवा, पळूस तालुक्याच्या सीमेलगत साडेदहा चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. सागरेश्वर अभयारण्य म्हणजे एक दुर्मिळ प्रयोग असून स्थानिकांच्या सहकार्याने परिसराचे नियोजनबद्धरित्या वनक्षेत्रात रूपांतर करण्यात आले आहे. उजाड माळरानावर प्राणी, पक्षी, वृक्षवल्लींनी समृद्ध अभयारण्य स्थापण्याच्या महत्प्रयासाचा प्रत्यय येथे पोहचल्यावर आल्याशिवाय राहत नाही. अभयारण्याचा परिसर निम, कशिद, सुबाभूळ, गुलमोहर, अंजन, निलगिरी, सिरस यासररख्या वृक्षराजीने समृद्ध आहे. मात्र बहुतांश वृक्षराजीही लागवड करून संवर्धित करण्यात आलेली आहे. सांबर, चितळ, काळवीट, भेर, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजर यासारख्या प्राण्यांचा अभयारण्यात मुक्त संचार आहे. पक्षांचाही येथे मुक्त विहार आढळून येतो. येथे मोरांची संख्या खूप आहे. सागरेश्वरला १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला होता.
अभयारण्यास धार्मिक, सांस्कृतिक, पुरातत्त्वदृष्ट्याही महत्त्व आहे. येथील प्राचीन शिवमंदिरावरून अभयारण्यास सागरेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे. अभयारण्यास लागूनच येथे भगवान शंकराचे एक मोठे मंदिर व इतर देवदेवतांच्या सुमारे एकावन्न लहान मंदिरांचा समूह आहे.
अभयारण्यास धार्मिक, सांस्कृतिक, पुरातत्त्वदृष्ट्याही महत्त्व आहे. येथील प्राचीन शिवमंदिरावरून अभयारण्यास सागरेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे. अभयारण्यास लागूनच येथे भगवान शंकराचे एक मोठे मंदिर व इतर देवदेवतांच्या सुमारे एकावन्न लहान मंदिरांचा समूह आहे. मंदिरांचे बांधकाम सातवाहनाच्या काळातील आहे. सागरेश्वराच्या देवळापासून घाट ओलांडल्याबरोबर अभयारण्यास सुरूवात होते. येथे पर्वत कड्यावर कालभैरवाचे मंदिरही आहे. मंदिरात जायचे झाल्यास चिंचोळ्या बोगद्यातून प्रवेश आहे. कठिण बेसाल्टच्या दगडात हे मंदिर कोरण्यात आले असून पुरात्त्वदृष्टया महत्त्वपूर्ण आहे. सागरेश्वर अभयारण्याचे क्षेत्रफळ लहान असूनही येथे मोठ्या संख्येत पर्यटक येतात. आठवड्याच्या शेवटी एक दिवस निवांतपणे निर्सगाच्या सान्निध्यात घालवण्यासाठी हे अभयारण्य उत्तम आहे. पाठीवर सॅक टाकून प्राणी, पक्ष्यांच्या सहवासात दिवसभर भटकंती करायची आणि सागरेश्वराचे दर्शन घेऊन परतीची वाट धरायची... कसे पोहचायचे: सागरेश्वर येथे रेल्वे व रस्ता मार्गाने पोहचता येते. रेल्वेने जायचे झाल्यास कराड रेल्वेस्थानक चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. कराड हे पुणे-बेंगळूरू महागार्वार आहे. कराड येथून बसेस आहे. राहण्याची व्यवस्था: सागरेश्वर येथे वनखात्याचे विश्रांतीगृह आहे. यासाठी उपवनसंरक्षक, कोल्हापूर येथे संपर्क साधावा. मात्र सद्या या अभयारण्याकडे प्रचंड दुर्लक्ष झाल्याने कदाचित पर्यटकांना उपरोल्लेखित अनुभव येईलच, हे सांगता येत नाही.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान- जंगलसफरीचा अविस्मरणीय आनंद



ताडोबा राष्ट्रीय उद्यान पूर्व विदर्भातील शुष्क पानझडी वनांच्या पट्ट्यात चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ताडोबा व अंधारी राष्ट्रीय उद्यान राज्यातील जुन्या उद्यानांपैकी एक आहे. साधारणता: सातशे चौरस किलोमीटर संरक्षित जंगलक्षेत्रात ही उद्यान वसलेली आहेत. ताडोबा व अंधारी व्याघ्र प्रकल्पही तितकाच जुना. ताडोबा अभयारण्य नैसर्गिक वनस्पती आणि जीवसृष्टीने समृद्ध आहे. येथे वाघ, बिबटे, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा, काळवीट, ससे, रानमांजर यासारख्या प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो. ताडोबा अभयारण्यात जागोजागी पाणवठे आहेत. पाणवठ्यानजीकच मचाणाचीही व्यवस्था करण्यात आली असल्याने जीवसृष्टी अनुभवण्याचा अपूर्व आनंद येथे मिळतो. ताडोबा अभयारण्यात पर्यटन निवासस्थानांचीही व्यवस्था असल्याने निर्सगाच्या सानिध्यात राहण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. या भागातील जंगलात बांबूची वने मोठ्या प्रमाणात आहेत. मोहाची वृक्षेही भरपूर आहेत. आदिवासींचा जीवनव्यवहार हा जंगलाशी जुळलेला असतो. अन्नापासून तर पेयापर्यंत सर्व जंगलाचं देणं. आदिवासी लोक मोहांच्या फुलापासून दारू काढून प्रसंगानुरूप मद्यपानाचा आनंद घेतात. या वनक्षेत्राचे ताडोबा नांवही आदिवासी संस्कृतीशीच जुळलेले आहे. त्यांचा देव 'तरू' यावरून ताडोबा नांव पडल्याचे मानण्यात येते. विस्तीर्ण वनांचे पट्टे व जैवविविधता या भागाचे वैशिष्ट्य आहे.
ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प एकोणविसशे पच्चावन साली अस्तित्वात आला. यामधील ताडोबा राष्ट्रीय उद्यान पच्चावन साली तर अंधेरी वन्यजीव अभयारण्याची ‍निर्मिती झाली एकोणविसशे अठ्ठ्यांऐंशी या वर्षी. एकोणविसशे अठ्ठ्यान्यवच्या वन्यजीव गणनेनुसार येथे चाळिसहून अधिक वाघ असल्याची नोंद आहे. पर्यटकांसाठी येथे विश्रांतीगृह व 36 खाटांचे हॉस्टेलही आहे. त्यासाठी आपणांस तेथील फील्ड डिरेक्टरशी संपर्क साधावा लागेल.
व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यात गेलो म्हणजे जंगलसफारी ओघानेच आली. येथे प्रक्षिशित गाईड्सी उपलब्ध आहेत. जंगलसफारीसाठी जवळपास दहा बारा जण बसतील अशी मिनिबसही आहे. ताडोबात निर्सगाच्या सानिध्यात वन्यजीव, पक्षी व सृष्टीचा अविष्कार अनुभवायचा असल्यास बायनालर, टॉर्च, उन्हाच्या टोप्या, गॉगल्स यासारखी आवश्यक साधने घ्यायला विसरू नका. ताडोबा तळ्याकाठी महाकाय वृक्षाछायेत आदिवासींचे दैवत आहे. येते दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरते. येथूनच जवळ म्हणजे पाच किलोमीटरवर पंचधारा स्थळही भेट देण्याजोगे आहे. निसर्गातून, विस्तीर्ण पसरलेल्या गवताळ प्रदेशातून फिरतानाच दाट जंगलातून चालण्याचा थरार अनुभवायचा असल्यास येथून फार दूर नसलेल्या जामुनबादी पर्यंतची वाट तुडवायला हरकत नाही. जाण्याचा मार्ग : ताडोबास आपणं रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने जोडले असल्याने आपल्या पसंतीनुसार प्रवास करून येथे सहज पोहचू शकता. नागपूर विमानतळाचे अंतर आहे येथून अवघे दीडशे किलोमीटर. रेल्वेने जायचे झाल्यास रेल्वेने चंद्रपुरला उतरायचे. चंद्रपुराहून येथील अंतर आहे फक्त चाळीस किलोमीटर. चंद्रपूर किंवा चिमूर येथून आपण बसं गाठून येथे पोहचू शकता.

Sunday, October 26, 2008

नरवीर तानाजीचा 'सिंहगड'


तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा किल्ला म्हणजे सिंहगड. पुणे शहराच्या नैऋत्येला सिंहगड हा किल्ला आहे. सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर या उपरांगेवार आहे.भुलेश्वराची उपरांग पुण्याच्या दक्षिणेला असून ती पुर्व पश्चिम अशी धावते. या रांगेमध्ये सिंहगड, सोनोरी आणि दौलतमंगळ असे तीन किल्ले आहेत.सिंहगड हा डोंगरी किल्ला असून याचे भौगोलिक स्थान अतिशय महत्वाचे आहे. सिंहगडावर जाण्यासाठी काही वेगवेगळे मार्ग आहे. पुर्वीच्या काळात सिंहगडावर जाण्यासाठी दक्षेणेकडील कल्याण दरवाजा मार्ग वापरण्यात येत असे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला कल्याण नावाचे छोटेसे गाव आहे. तेथून हा मार्ग गडावर येतो. कोंढणपूर या पुर्व पायथ्याच्या गावातून दमछाक करणार्‍या वाटेनेही सिंहगडावर येता येते. उत्तरेकडील खानापूर येथूनही लांबच्या मार्गाने सिंहगडावर चढाई करता येते. सिंहगडावर जाणार्‍या या मार्गाशिवाय सर्रास वापरला जाणारा मार्ग म्हणजे उत्तर पायथ्याचा अतकरवाडीचा मार्ग. पुण्याच्या दिशेला असल्यामुळे सिंहगडाच्या या दरवाजांना पुणे दरवाजे असे नाव मिळाले आहे. हे एका पाठोपाठ काही अंतरावर असलेले तीन दरवाजे आहेत. वेगवेगळ्या कालखंडामध्ये बांधलेले हे दरवाजे कड्याच्या वर आहेत.पहिला दरवाजा ओलांडून आपण दुसर्‍या दरवाजाकडे निघालो की डावीकडे तटबंदीमध्ये एक दिंडी दरवाजा (लहान दरवाजा) आहे. या दरवाजातून आत गेल्यावर आपण खंदकडा (खांदकडा ?) म्हणून असलेल्या भागात पोहोचतो. येथे तटबंदी व बुरुज आहे. हा सर्वात पुर्वेकडील भाग आहे. हा
तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची आठवण करून देणारा किल्ला म्हणजे सिंहगड. पुणे शहराच्या नैऋत्येला सिंहगड हा किल्ला आहे. सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर या उपरांगेवार आहे.भुलेश्वराची उपरांग पुण्याच्या दक्षिणेला असून ती पुर्व पश्चिम अशी धावते.
भाग बघून पुन्हा आपण दिंडी दरवाजातून येवून दुसरा दरवाजा ओलांडतो . येथून थोडीशी सपाटी आहे. या सपाटीच्या टोकाला तिसरा दरवाजा आहे. या दरवाजाचे बुरुज मोठे आहेत. दरवाजा पुढील काही पायर्‍या चढताच उजव्या बाजूला बालदखाना नावाची इमारत आहे. कड्याजवळच ही इमारत असून अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहे.

'हीरोज' प्रत्येकात दडलाय हिरो


निर्माता - समीर कर्णिक, भरत शाह, विकास कपूर दिग्दर्शक - समीर कर्णिक संगीतकार - साजिद-वाजिद, मॉटी शर्माकलाकार - सलमान खान, सनी देओल, बॉबी देओल, प्रीती झिंटा, सोहेल खान, वत्सल सेठ, मिथुन चक्रवर्ती, डीनो मोरिया, रिया सेन.

अनेकवेळा एखादी परिस्थिती बदलण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. एखादी यात्राही तुमच्या जीवनाला दिशा देऊ शकते. 'हीरोज' अशाच एका यात्रेची कथा आहे. प्रत्येक माणूस हीरोच असतो आणि अनुभवातून याची अनुभूती येते असा या चित्रपटाचा आशय आहे. हा चित्रपट 'मोटरसायकल डायरीज' या चित्रपटावर आधारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सॅमी (सोहेल खान) आणि अली (वत्सल सेठ) जिगरी मित्र आहेत. त्यांनी शाळेपासून ते करियरपर्यंतचे जीवनातील प्रत्येक निर्णय एकत्रित घेतले आहेत. दोघांचे विचार वेगळे आहेत पण, ते एकमेकांवर अवलंबून आहेत. सॅमीला हसणे-हसवणे आवडते तो हसण्यासाठी निमित्त शोधत असतो. तर दुसरीकडे अली शांत राहणे पसंत करतो. त्यांना फिल्मस्कूलमधून एक प्रोजेक्ट मिळतो. त्यामध्ये त्यांना कित्येक हजार किलोमीटराचा प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी तीन पत्रे पोहचवाची असतात.
हीच यात्रा त्यांच्या जीवनाला नवी दिशा देणार आहे यांपासून अली आणि सॅमी अनभिज्ञ असतात. त्यांची भेट बलकारसिंह (सलमान खान) आणि कुलजीत कौर (प्रीती झिंटा) यांच्याशी होते. बलकारसिंह हा खेडेगावात राहणारा सरळमार्गी माणूस आहे. देशासाठी तो सर्वस्व पणाला लावेल. कुलजीत कौर ही मुलगी असली तरी आपल्या कुटुंबासाठी ती मुलासारखीच भूमिका बजावत असते.
विक्रम शेरगिल (सनी देओल) आणि धनंजय शेरगिल (बॉबी देओल) यांना सॅमी आणि अली भेटतात. विक्रमला भीती माहीत नसते. देशासाठी तो आपला जीवही पणाला लावू शकतो. दुसरीकडे धनंजय जीवनाचा पुरेपूर आनंद लुटणारा आहे. डॉ. नक्वी (मिथुन चक्रवर्ती) आपला मुलगा साहिल (डीनो मोरिया) वर खूप प्रेम करत असतात. सैनिकांचा गणवेश म्हणजे लोकांची सेवा एवढेच साहिलच्या डोक्यात असते. चित्रपटाचे दिग्दर्शक समीर कर्णिक यांच्या मते 'हीरोज़' हा वॉर चित्रपट नसून त्याला लष्कराची पाश्वभूमी आहे. चित्रपटाचे शूटिंग हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पंजाब मध्ये झाले आहे.

http://yogeshnarvekar.blogspot.com


welcome to yogesh narvekar blog.