नागझिरा वन्यजीव अभयारण्याचे निर्सगाच्या कुशीत इंद्रधनुषी सौदर्यांने नटलेला स्वप्नातील भूप्रदेश असेच वर्णन करावे लागेल. येथील वन्यप्राणी व जैवीक विविधता चकीत करणारी आहे. लांबच लांब पसरलेले नवश्रीने नटलेले सुंदर जमीनीचे पट्टे.... निर्सगाच्या सौदर्याविष्काराचे मनोहारी रूप प्रतिबिंबीत करणारी नैसर्गिक तळे...चांदण्या रात्रीच्या निवांत शांततेत पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांना याची देही याची डोळा बघण्यातला थरार... प्रातसमयी उगवतीची किरणे पडायला सुरूवात झाल्यावर पक्षांच्या मंजूळ सुरावटीने भारून गेलेले वातावरण.... अनुभवायचे ते नागझिर्यातच. नागझिर्यची जादू वर्षाकाठी 30,000 हजार पर्यटकांना साद घालते.
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात 152 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात नागझिरा परसले आहे. नागझिरा 1970 साली अस्तित्वात आले. गोंदिया जिल्ह्यास मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या सीमा लागल्या आहेत. वैनगंगा नदीने येथील नैसर्गिक विविधतेत भर घातली आहे. नागझिर्याची भूमी विविध वन्यजीव व वनस्पतींनी समृद्ध आहे. अभयारण्यातून फिरताना छोट्या-मोठ्या पर्वतरांगा व विस्तीर्ण पसरलेली तळी दृष्टीस पडतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर पसरलेल्या उंच टेकड्या व हिरव्याकच्च वनराईत आढळणारी नैसगिर्क तळी मनास सुखावतात. नागझिर्यात कित्येक प्रकारच्या मासळ्या आढळतात. सस्तन प्राण्यांच्या 34 प्रजाती, पक्षांच्या 160, सरपटणार्या प्राण्यांच्या 30 हून अधिक अनं फुलपाखरांच्या 50 प्रजातीं येथे आढळतात. नागझिर्यातील जंगल सफर डोळ्याचे पारणे फेडण्यासोबतच विविधांगी अनुभव देते. वाघ, बिबटे, चितळ, अस्वल, रानगवे, रानकुत्रे, निलगाय, खवल्या मांजर येथील प्राणीजीवन समृद्ध करते. वृक्षवल्लीही जैविक विविधतेत भर घालणारी. आवळा, कुसुम, सेमळ, तेंदु, जावळ, साग, बेहडा, उंबर यासारखी वृक्षे येथे आढळतात.
नागझिर्याहून जवळत 50 किलोमीटर अंतरावर नागझिर्यास भेट द्यायची झाल्यास उप-वनसंरक्षकास संपर्क साधून आवश्यक माहिती घ्यावी म्हणजे वेळेवर तारांबळ उडणार नाही. या भागातील भूभागास दृष्टीलागण्याजोगे सौदर्य लाभले आहे. नागझिर्याची सैर झाली की आपण नवेगाव राष्ट्रीय उद्यानासही भेट देवू शकता. इटीयाडोहही येथून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर आहे. अन हं, ट्रेकर्ससाठी अवघ्या 70 किलोमीटरवर प्रतागगढही आहे. दिवसभर जंगलसफारी आटोपल्यावर जंगलातील रात्रीच्या निवांत क्षणातील वन्यजीवांच्या हालचाली न्याहाळायच्या असतील तर मधुकुंज, लताकुंज ही विश्रामगृहेही आपल्या सेवेत आहेत. निसर्गयात्री मारूती चितमपल्ली यांनी येथील रानवाटा तूडवल्या आहेत. मनात हर्ष भरणार्या हिवाळ्याचे आगमन होतच आहे तर व्हा मग सज्ज आपणही तूडवायला नागझिर्याचा रानवाटा....
जाण्याचा मार्ग : नागझिर्यास आपण विमान, रेल्वे व रस्ता मार्गे पोहचू शकता. येथून नागपुर विमानतळ अवघ्या 120 किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन आहे गोंदिया. अंतर आहे फक्त 45 किलोमीटर. बसने जायचे झाल्यास साकोली (22 किलोमीटर) येथून गाड्यांची सेवा उपलब्ध आहे.
भेट द्यायची उत्तम वेळ : ऑक्टोबर ते एप्रिल. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत.
No comments:
Post a Comment