Tuesday, December 30, 2008
ओंकारेश्वराची शाही स्वारी
मनोवांच्छित ते देणारा सिद्धिविनायक
श्री अरूणाचलेश्वर (तिरूअन्नामलय्यर) मंदिर
Sunday, December 28, 2008
सर्वधर्मभावाचे प्रतीकः अजमेर शरीफ दर्गा
अंबाजी येथील अंबा माता
Saturday, December 6, 2008
तीन देवींचे त्रिशक्ती रूप
या महाकालीला दहा तोंड व दहा पाय आहेत। ती निळ्याशार रंगाची आहे. तिच्या आठही हातात नक्षीदार आभुषणे व शस्त्रे आहेत. तिने तलवार, चक्र, धनुष्य, मानवी डोके, चक्र, कमान, शंख, गोफ, खण आदी आयुधे धारण केली आहेत. तिला योगनिद्रा असे संबोधले जाते. तिच्या प्रभावाखालीच भगवान विष्णूला निद्रेच्या आधीन झाले. म्हणून ब्रह्मदेवाने तिला विनंती केली, की मधू व कैटभ या राक्षसांचा निःपात करण्यासाठी विष्णूला निद्रेतून जागे कर.
महालक्ष्मी ही देवीचे राजस रूप आहे। ही महालक्ष्मी लाल रंगाची आहे. तिच्या अठरा हातांमध्ये तलवार, खण, धनुष्यबाण, पाण्याचे भांडे, कमळ, सुदर्शन चक्र, जपमाळ, वज्रास्त्र, गदा, घंटा, त्रिशूळ, ब्रम्हपाश आदी शस्त्रे आहेत. ही देवी शक्तीचे आणि त्याचवेळी आसुरी शक्तींविरूद्ध लढण्याच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा रंग रक्ताचा, युद्धाचा म्हणजे लाल आहे. तिने महिषासूरालाही संपविले आहे. म्हणूनच महिषासूर मर्दिनी म्हणूनही शक्ती उपासक तिची उपासना करतात.
महासरस्वती ही देवीचे सात्विक रूप आहे। ती शिशिरातल्या चंद्रासारखी दिसते. तिच्या आठ हातांमध्ये घंटा, त्रिशूळ, धनुष्यबाण आदी शस्त्रास्त्रे आहेत. ही देवी शारीरिक शक्तीचे व सौंदर्याचे प्रतीक आहे. सरस्वतीने धुम्रलोचन, चंड, मुंड, निशुंभ, शुंभ या असुरांचा वध केला. माहेश्वरी किंवा राज राजेश्वरी ही या तिनही देवींच्या उर्जेचा स्त्रोत आहे. तिलाच 'ललिता त्रिपूरसुंदरी' असे तिला म्हणतात. ललिता म्हणजे सौंदर्य.
मदर मेरीचे केरळमधील अनोखे चर्च
शिवशंकराचे निवासस्थान- कैलास
जैन महातीर्थ मोहनखेडा
Monday, December 1, 2008
भाविकांचे श्रध्दास्थान शिर्डीचे साईबाबा
जैन सिद्ध क्षेत्र बावनगजा
धारची भोजशाळा
केरळमधील आट्टुकाल देवीचे मंदिर
आट्टुकाल गावातील मुल्लुवीड कुटुंबाला ही देवी पहिल्यांदा दिसली। तोच मंदिराच्या उत्पत्तीचा आधार मानला जातो. ही देवी पतिव्रताधर्माच्या प्रतीकाच्या रूपात प्रख्यात असलेली कणकींचा अवतार मानली जाते.
आट्टुकाल मंदिराचा पोंकाला उत्सव हा सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध उत्सव आहे। हा सण द्राविडी परंपरेतील आहे. हा उत्सव कुंभ महिन्यात पूर्ण नक्षत्र आणि पौर्णिमा दोघांच्या मीलनाच्या मुहूर्तावर साजरा केला जातो. दिवसा कीर्तन, भजन आणि रात्री लोकनृत्य आणि इतर कार्यक्रम चालतात. संगीत कार्यक्रमदेखील चालतात. सजविलेले रथ-घोडे यांची मिरवणूक निघते. नारळाच्या पानांपासून किंवा चमचमणार्या कागदांपासून सजविलेल्या तख्तावर देवीची मूर्ती ठेवून दीपमाळा बनविल्या जातात. त्या डोक्यावर ठेवून वाजत गाजत, संगीताच्या तालावर काढल्या जाणार्या मिरवणुका मनमोहक असतात.
शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप
वाराणसी अर्थात काशीचे महत्त्व फार मोठे आहे। पृथ्वीची निर्मिर्ती झाली तेव्हा प्रकाशाची पहिली किरणे काशीच्या भूमीवरच पडली असे मानले जाते. तेव्हापासूनच काशी ज्ञान, अध्यात्माचे केंद्र झाले. काशीची निर्मिती झाल्यानंतर काही कालांतराने शंकराने येथे काही काळ वास्तव्य केले होते. ब्रह्माने दहा घोड्यांचा रथ (दशाश्वमेघ) घाटावर पाठवून त्यांचे स्वागत केले होते.
गंगेच्या किनार्यावर अरुंद विश्वनाथ गल्लीत विश्वनाथाचे मंदिर आहे। त्याच्या चहूबाजूने मंदिरे आहेत. येथे एक विहीरही आहे. तिला 'ज्ञानव्यापी'ची संज्ञा दिली जाते. ती मंदिराच्या उत्तरेला आहे. विश्वनाथ मंदिराच्या आत एक मंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या आत चांदीने मढविलेले परमेश्वर विश्वनाथांचे साठ सेंटिमीटर उंच शिवलिंग आहे. हे शिवलिंग काळ्या दगडातून निर्मित आहे. मंदिराचा आतील परिसर मोठा नसला तरीही तेथील वातावरण शिवमय आहे.
ॐ शनिदेवाय नमः
तिरूचनूरची पद्मावती देवी
स्तंभेश्वर महादेव
देवासची चामुंडा आणि तुळजा देवी
इंदूरची बिजासन देवी
आधी ही टेकडी होळकरांच्या राज्यात होती। एकदा शिकारीसाठी आलेले असताना राजघराण्यातील लोकांची दृष्टी ह्या मंदिरावर पडली. त्यानंतर मग सन 1920 मध्ये येथे पक्के मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत येथे भाविकांची अपार गर्दी असते. येथे केलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या प्रांगणात एक तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत. या माशांना अन्न घातले तर पुण्य प्राप्त होऊन सर्व मनोरथ पूर्ण होतात, असे भाविक मानतात. मंदिरात प्रत्येक नवरात्रीला यात्रा भरते. टेकडीवरून बघितल्यावर इंदूर शहराचे नयनरम्य दृश्य दिसते. मंदिरच्या जवळच गोम्मटगिरी आणि हिंकारगिरी नावाचे जैनांचे पवित्र स्थळ आहे. येथे दरवर्षी चातुर्मासात जैन मुनी येतात.
कसे पोहचाल
इंदूर मध्यप्रदेशची औद्योगिक राजधानी आहे. मुंबई-आग्रा महामार्ग इंदूरमधूनच जातो. देशाच्या कुठल्याही भागातून येथे रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गे पोहचता येते. हे मंदिर इंदूर विमानतळापासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे.
जागृत देवस्थान चंद्रिका देवी मंदिर
परशुरामाचे जन्मस्थळ-जलालाबाद
येथे भगवान परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे। मंदिराच्या गाभार्यात शिवलिंग आहे. समोरच भगवान परशुरामाची प्राचीन मूर्ती आहे. परशुरामाने येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यानंतर भाविकांनी या मंदिराचे बांधकाम केले होते, असे मानले जाते. मंदिर 30 फूट उंचीवर बांधण्यात आले असून मंदिराची उंची हे प्राचीनतेचे उदाहरण आहे. अनेक वेळा हे मंदिर तोडण्यात आले आणि भक्तांनी पु्न्हा या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धारावेळी ढिगार्याखाली परशुरामाशी संबंधित अनेक वस्तू सापडल्या.
एकदा मंदिराच्या ढिगार्याखाली आठ फूट उंच आणि अडीच फूट रूंदीचा परशू सापडला होता. तो आजही मंदिराच्या उजव्या बाजूला आहे. सत्ययुगाच्या शेवटी परशुरामाने अवतार घेतला होता असे मानण्यात येते. रोहिणी नक्षत्रात परशुराम याच भागात जन्मले होते. त्यांचे वडील मदग्नी यांचा जन्म येथेच झाला होता असे सांगितले जाते. परशुरामाची आई रेणुका दक्षिण देशाची राजकुमारी होती.
Friday, November 28, 2008
दक्षिण काशी अर्थात श्रीकालहस्ती
श्री लक्ष्मी नरसिंह चंदनोत्सव
संत सिंगाजीचे समाधी स्थळ
धुनीवाले दादाजी
योगेंद्र शीलनाथ बाबा
खांडव्याचे भवानीमाता मंदिर
तमिळनाडूतील वैद्यनाथस्वामी मंदिर
श्री जगदंबा देवी
मुंबईचे महालक्ष्मी मंदिर
श्री नटराज मंदिर चिदंबरम
देवाधिदेव भगवान शंकराचे सर्वोच्च देवतेच्या रूपात पूजन करणा-या भक्तांसाठी तमिळनाडूतील चिदंबरम येथील नटराज मंदिर भक्तीच्या प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे। आपल्यातील सर्व पवित्र शक्तींनी महादेव शंकराने या ठिकाणाला पावन केले असल्याची भक्तांचा समज आहे।पुराणांमध्ये असलेल्या उल्लेखानुसार प्रभू शिव येथे 'ॐ'कारच्या प्रणव मंत्र रूपात विराजमान आहेत. याचमुळे भक्तांसाठी या मंदिराचे स्थान महत्त्वाचे आहे. हे मंदिर भक्तांसाठी प्रचंड महत्त्वाचे आहे. भगवान शिवाच्या पाच भक्ती स्थळांपैकी चिदंबरम एक असून हे स्थान शंकराचे आकाश क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नटराज मंदिराला अग्नी मूल म्हणूनही ओळखले जाते. भोलेनाथ येथे ज्योती रूपात विराजमान असल्याचे भक्तांचे म्हणणे आहे.
इतर चार क्षेत्रांमध्ये कालाहस्ती (आंध्रप्रदेश) किंवा वायू, कांचीपुरमचे पृथ्वी, तिरुवनिका- जल आणि अरुणाचलेश्वर (तिरुवनामलाई) म्हणजेच अग्नी यांचा समावेश आहे। हिंदू धर्मातील मान्यतेनुसार याच पंचतत्त्वांनी (पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश) मानवी शरीराची निर्मिती झाली आहे. नटराज मंदिराला अग्नी मूळ या नावानेही ओळखले जाते.मंदिराची रचना अत्यंत सुबक व आकर्षक असून वैशिष्ट्यपूर्ण आहे. चार सुंदर आणि मोठ्या घुमटांमुळे मंदिर भव्य वाटते. मंदिराची अंतर्गत रचना, सजावट, शिल्पकारी आणि मंदिराचे व्यापक क्षेत्रफळ यामुळे ते सहज डोळ्यात भरते.
शिवाच्या नटराज स्वरूपातील मूर्तीमुळे भरतनाट्यम कलावंतांचेही हे श्रध्दास्थान आहे। मंदिराच्या प्रत्येक खांबावर भरतनाट्यम नृत्याच्या वेगवेगळ्या शैली दाखविणा-या मूर्ती आहेत. मंदिराच्या गाभा-यात भगवान शिवकाम सुंदरी (पार्वती) सह स्थापित आहेत. मंदिराची देखरेख आणि पूजाविधी पारंपरिक पुजारींकडून केली जाते. मंदिराला भक्तांकडून दिल्या जाणा-या देणगीतूनच मंदिराचे कामकाज चालविले जाते.शिव क्षेत्रम म्हणूनही मंदिर ओळखले जाते. भगवान गोविंदाराज यांची मूर्तीही मंदिरात शिवशंकराजवळच स्थापन करण्यात आली आहे. मंदिर परिसरात अत्यंत सुंदर तलाव आणि नृत्य परिसर आहे. येथे दरवर्षी होणा-या नृत्य कार्यक्रमासाठी दूरवरून कलावंत सहभागी होत असतात.
कसे जाणार
रेल्वे मार्ग : चिदंबरम चेन्नई-तंजावर मार्गावर चेन्नईपासून 245 किमी अंतरावर मंदिर आहे. चिदंबरम नावानेच रेलवे स्टेशन ओळखले जाते. रस्त्याने : चेन्नईहून कुठल्याही वाहनाने 4-5 तासांत चिदंबरमला पोचता येते. विमान सेवा : चिदंबरम जाण्यासाठी सर्वाधिक जवळचे विमानतळ चेन्नई आहे. तेथून रस्त्याने किंवा रेल्वे मार्गे चिदंबरम जाता येईल.
जागृत देवस्थानः उलटे हनुमान
Thursday, November 20, 2008
अविस्मरणीय केदारनाथ
गोव्यातील हिरवीगार सृष्टी!
फ्युजन
त्यांच्या मानाने तसा मी नवखाच. गेली काही वर्ष जपानमधल्या घडामोडी तिकडच्या मराठी मंडळींपर्यंत पोहोचवण्याचे काम श्रीकांत अत्रे करत आलेले आहेत. त्यात, आपण थोडीशी भर घालावी या हेतूने करत असलेला हा पहिलाच प्रयोग.
टोकियोजवळ असलेल्या शिवमाता शहरामधल्या "ताईसाकुतेन' या प्रसिद्ध ओतेरा (देऊळ) मध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम झाला। त्याबद्दल सांगायच्या आधी, या ओतेराबद्दल थोडंसं. हे देऊळ तीनशे वर्ष जुनं आहे आणि त्यात असलेली ८५० वर्ष पुरातन मूर्ती देवाधिदेव इंद्राची आहे. हे ऐकून माझा विश्वासच बसला नाही. इतकेच नाही, तर इंद्राच्या व्यक्तिरेखेवर आधारित ऍनिमेशन सिरीजसुद्धा आहे. असो. त्याबद्दल लिहायचे तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल.
भरतनाट्य्मसारखा अवघड न्यृत्यप्रकार त्यांनी आत्मसात केला आहे. गेली काही वर्ष त्या इथे भरतनाट्य्म शिकवत आहेत. त्यांच्याकडे १२० मुली भरतनाट्य्म शिकत आहेत.
भारतीय मुली तर आहेतच पण जपानी मुलींची संख्याही लक्षणीय आहे। या मुली नुसतंच शिकत नाहीत तर त्यांनी ही कला चांगलीच अवगत केली आहे. गेली काही वर्ष इथे होत असलेल्या "नमस्ते इंडिया' सारख्या कार्यक्रमातून त्या आपली कला सादर करत आल्या आहेत. कोणी जपानी, भारतीय कलेबद्दल एवढे काही करते आहे हे बघून आनंद वाटला.
भरतनाट्य्मनंतर सादर झाला तो बॉलिवडू-टॉलिवूड डान्स।
असं हे आगळंवेगळं फ्युजन... जपानी आणि भारतीय मुलींनी एकत्र येऊन केलेल्या भरतनाट्य्म आणि बॉलिवूड डान्सचं
निसर्गरम्य अरिझोना
Friday, November 14, 2008
अजंठा
अजंठा-वेरूळ लेणी म्हणूनच जगप्रसिद्ध झालेली आहेत. परंतु आश्चर्य असे की, जगविख्यात झालेल्या अजंठा येथील गुंफा गेल्या शतकात योगायोगानेच प्रकाशात आल्या. एरवी त्या शेकडो वर्षे अज्ञातवासातच होत्या आणि पुढेही त्या अंधारातच राहिल्या असत्या.
इ। स. १८१९ मध्ये एक ब्रिटीश क्रॅप्टन जॉन स्मिथ या परिसरातील गर्द जंगलात शिकार खेळण्यासाठी आला असताना जंगलाने व्यापलेल्या या गुंफा अचानक त्याच्या नजरेस आल्या आणि त्यानंतर मात्र तेथील रान मोकळं करून या गुंफाचा शोध घेण्यात आला.
ज्या डोंगरात ही लेणी खोदण्यात आली आहेत. त्यांच्या माथ्यावर एक जलौघ असून त्याचे पाणी एका नैसर्गिक कुंडात साठवले जाते.
या कुंडास सप्तकुंड असे म्हणतात. क्र. ९ व १० च्या लेण्यात चैत्यगृहे आहेत. ८, १२, १३ व १५ क्रमाकांच्या लेण्यांचाही मठ किंवा प्रवचने यासारख्या धार्मिक कर्मासाठी उपयोग होत असावा. लेणी क्र. १, २, १६, १७, १९ व २६ या सुद्धा अशाच कार्यासाठी तयार करण्यात आली असावीत. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध आणि बुद्ध जीवन शिल्प व चित्रकलेद्वारे चितारण्यात आले आहे. लेण्यांमध्ये चितारण्यात आलेली रंगीत चित्रे तर अतिशय अप्रतिम आहेत. शेकडो वर्षे उलटूनही त्यातील रंग मात्र अजूनही उबदार आहेत. बुद्धावतार, जातककथा असे बुद्धजीवनाशी निगडित प्रसंग येथे कलात्मकतेने चित्रित केलेले आहेत. बोधीसत्व पद्मपाणी, आकाशगामी अप्सरा, बुद्धाचे सहस्त्रावतार, नृत्यगायन करणाऱ्या अप्सरा, पत्नीकडे भिक्षेची याचना करणारा बुद्ध, राजसभा आदि चित्रे खरोखरीज अद्वितीय आहेत. गुंफांमध्ये चितारलेली रंगीत चित्रे आणि शिल्पचित्रे भव्य तर आहेतच पण त्यातील भाव, नाट्य, बांधेसूदपणा, लय आणि गति यामुळे सर्व कलाकृतींना कमालीचा जिवंतपणा आलेला आहे.