जपानमध्ये राहायला येऊन साधारण तीन वर्ष झाली. तसं बघायला गेलं तर ३ वर्ष हा कालखंड मला माझ्यासाठी मोठा वाटत असला, तरी इथे बरीच मंडळी १०-१५ वर्षांपासून आहेत.
त्यांच्या मानाने तसा मी नवखाच. गेली काही वर्ष जपानमधल्या घडामोडी तिकडच्या मराठी मंडळींपर्यंत पोहोचवण्याचे काम श्रीकांत अत्रे करत आलेले आहेत. त्यात, आपण थोडीशी भर घालावी या हेतूने करत असलेला हा पहिलाच प्रयोग.
टोकियोजवळ असलेल्या शिवमाता शहरामधल्या "ताईसाकुतेन' या प्रसिद्ध ओतेरा (देऊळ) मध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम झाला। त्याबद्दल सांगायच्या आधी, या ओतेराबद्दल थोडंसं. हे देऊळ तीनशे वर्ष जुनं आहे आणि त्यात असलेली ८५० वर्ष पुरातन मूर्ती देवाधिदेव इंद्राची आहे. हे ऐकून माझा विश्वासच बसला नाही. इतकेच नाही, तर इंद्राच्या व्यक्तिरेखेवर आधारित ऍनिमेशन सिरीजसुद्धा आहे. असो. त्याबद्दल लिहायचे तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल.

जूनला भरतनाट्य्म आणि बॉलीवूड-टॉलिवूड डान्सचा एक कार्यक्रम झाला. क्योको नोवी या जपानी सेन्सेईनी (शिक्षिका) हा कार्यक्रम बसवला होता. २५ वर्षांपूर्वी नोवी सेन्सेई भारतात राहून भरतनाट्य्म शिकल्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या नृत्यांची आवड आहे.
भरतनाट्य्मसारखा अवघड न्यृत्यप्रकार त्यांनी आत्मसात केला आहे. गेली काही वर्ष त्या इथे भरतनाट्य्म शिकवत आहेत. त्यांच्याकडे १२० मुली भरतनाट्य्म शिकत आहेत.
भारतीय मुली तर आहेतच पण जपानी मुलींची संख्याही लक्षणीय आहे। या मुली नुसतंच शिकत नाहीत तर त्यांनी ही कला चांगलीच अवगत केली आहे. गेली काही वर्ष इथे होत असलेल्या "नमस्ते इंडिया' सारख्या कार्यक्रमातून त्या आपली कला सादर करत आल्या आहेत. कोणी जपानी, भारतीय कलेबद्दल एवढे काही करते आहे हे बघून आनंद वाटला.

नोवी सेन्सेई वेगवेगळ्या ठिकाणी चालवत असलेल्या वर्गातील मुलींनी नृत्य सादर केले. यामध्ये अगदी लहान मुलींपासून मोठ्या मुलींपर्यंत सर्वांचाच सहभाग होता. स्वराली पारसनीस, इंदिरा पिंपळखरे, ईशा विसाळ, भैरवी देसाई अशा मराठी मुलींनीदेखील नृत्य सादर केले. या सर्वांमध्ये एँजेला नावाच्या जपानी मुलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिचे नृत्य अतिशय उत्तम आणि चेहऱ्यावरचे हावभावदेखील अतिशय सुंदर होते.
भरतनाट्य्मनंतर सादर झाला तो बॉलिवडू-टॉलिवूड डान्स।

जपानमध्ये सध्या बॉलिवूड, टॉलिवूडची क्रेझ आहे. रजनीकांत बऱ्याच जणांना माहीत आहे पण सध्या शाहरुख खान (जपानी लोकांच्या भाषेत किंग खान) ची चलती आहे. सध्याच्या नवीन ठेकेदार गाण्यांवर नृत्य झाले. जब वुई मेटमधल्या नगाडा नगाडा पासून ते ओम शांती ओममधल्या दर्दे डिस्कोपर्यंत सर्व गाणी झाली. "डोला रे...' या देवदासमधील गाण्यावर भरतनाट्य्म असा काहीसा जरा न जमलेला प्रयोगही बघायला मिळाला. या सर्वांमध्ये उठून दिसली ती प्राची ही छोटी मुलगी. तिने "फना' मधील "देश रंगीला रंगीला' या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य केले.
असं हे आगळंवेगळं फ्युजन... जपानी आणि भारतीय मुलींनी एकत्र येऊन केलेल्या भरतनाट्य्म आणि बॉलिवूड डान्सचं

No comments:
Post a Comment