एकीकडे कोलोरॅडो नदी, दुसरीकडे सोन्होरा वाळवंट, आणि तिसरीकडे रॉकी माऊंटन अशा निराळ्याच भौगोलिक विभागात अमेरिकेच्या पश्चिमी भागात "अरिझोना' आहे।
फिनीक्स शहर ही या राज्याची राजधानी। इथे खूप मोठी जनवस्ती आहे.
सुमारे ४१ लाख लोक फिनिक्स मधे राहतात आणि जवळ पास २० हज़ार भारतीय व भारतीय मूळ असलेल्या लोकांनी अरिझोनाला आपले निवासस्थान बनविले आहे. अरिझोना मधील उन्हाळा हा नागपुरी गर्मी सारखा आहे पण इकडे वातावरण कोरडे असल्यामुले कड़क उन्हाने हे राज्य ७ ते ८ महीने तप्त असते. १०० दिवस ४० अंश सेल्सिउस याहून अधिक तापमान इकडे असते. नोव्हेंबर ते एप्रिल या महिन्यात छान (उत्तर भरता सारखा) हवामान असल्याने बरेच लोक इकडे हिवाळ्यात अमेरिकेच्या थंड बर्फदार राज्यातून रहायला येतात. येथील "ग्रैंड कैनियन" ही जगातील सर्वात मोठी व सर्वात खोल नदीच्या पात्राने बनवलेली नैसर्गिक दरी आहे. बरोबरच डोंगर व दऱ्यांनी भरलेली रम्य जंगले आणि उन्हाने तापलेले वाळवंट तुम्हाला इकडे बघायला मिळेल.
No comments:
Post a Comment