संथ वाहणार्या कृष्णामाईच्या छायेत अनेकजण सुखी समाधानाचं जीवन जगत आहेत.हीच कृष्णा नदी अनेकांचे जीवन फुलवीत पुढे जाते. कृष्णाकाठाला महत्त्व असण्याचे इतरही कारणे आहेत. सांगलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची तर कराड येथे प्रितीसंगमावर भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची स्मारके उभी आहेत. याच ठिकाणी असलेल्या रामलिंग बेटाचा पर्यटनाच्यादृष्टिने विकास करण्यात आला आहे. सुशोभिकरणामुळे हा परिसर पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण बनला आहे. या स्थानाला भेट देणार्या पर्यटकांची संख्यादेखील वाढली आहे.सांगली, सातारा जिल्ह्याला वरदान ठरलेली जीवनदायिनी कृष्णामाईच्या तीरावर वाळवा तालुक्यात बहे येथे रामलिंग बेटाला भेट म्हणजे पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी असते. रमणीय व निसर्गसौंदर्याने नटलेलं हे ठिकाण आज राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावर झळकू लागले आहे. मुंबई - बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर इस्लामपूर शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर विकसित होत असलेल्या बहे रामलिंग बेट पर्यटन विकासासाठी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. बहे रामलिंग बेट पर्यटन विकासासाठी शासनाने गेल्या तीन वर्षापूर्वी सहा कोटी ८१ लाख ३४ हजाराचा निधी मंजूर करुन या पर्यटन स्थळाच्या विकासाला चालना दिली. या बेटावर प्राचीन श्रीराम मंदिर व अन्य छोटी मंदिरे आहेत. राम मंदिरासमोर आकर्षक भव्य मंडप असून भव्य नदीपात्र हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मंदिराच्या गाभार्यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती असून बाजूला मठामागे समर्थ रामदासांनी स्थापन केलेली श्री हनुमानाची मूर्ती आहे. मध्यभागी शिवलिंग आहे.रामलिंग बेटाच्या उत्तर बाजूने कृष्णानदी काशीमधल्या गंगा नदीसारखी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाटते.या बेटावर प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग स्थापन केल्याची आख्यायिका आहे. तसेच प्रभू रामचंद्र आपल्या चौदा वर्षाचा वनवास भोगून लंकेवरुन परत येत असता स्थानास या ठिकाणी थांबले, व सीतामाई जवळच्याच शिरटे गावी थांबल्या. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी स्थान करुन वाळूचे शिवलिंग स्थापन केले व त्याची पूजा करु लागले. त्यावेळी कृष्णामाईस खूपच आनंद झाला व ती आनंदाने गर्जना करु लागली. तेव्हा प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे मारुतीराया उभे होते त्यांनी 'हा आवाज कसला' म्हणून पाठीमागे वळून राहिले तर नदीस महापूर येत असल्याचे त्यांना दिसले व त्याच क्षणी मारुतीरायांनी आपले बलवान बाहू बाजूस केले व नदीचे पाणी थोपवून धरले. त्यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवास वाहू लागले आणि आपोआपच बेट तयार झाले. मारुतीरायाच्या बाहूमुळे या गावचे नाव 'बाहे' असे पडले. काळाच्या ओघात त्यांचाअपभ्रंश होवून बहे नाव रुढ झाले, अशी आख्यायिका आहे. या बेटावर प्राचीन श्रीराम मंदिर व अन्य छोटी मंदिरे आहेत. राम मंदिरासमोर आकर्षक भव्य मंडप असून भव्य नदीपात्र हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मंदिराच्या गाभार्यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती असून बाजूला मठामागे समर्थ रामदासांनी स्थापन केलेली श्री हनुमानाची मूर्ती व आहे. मध्यभागी शिवलिंग आहे.रामलिंग बेटाच्या उत्तर बाजूने कृष्णानदी काशीमधल्या गंगा नदीसारखी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाटते.या बेटावर प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग स्थापन केल्याची आख्यायिका आहे. तसेच प्रभू रामचंद्र आपल्या चौदा वर्षाचा वनवास भोगून लंकेवरुन परत येत असता स्थानास या ठिकाणी थांबले, व सीतामाई जवळच्याच शिरटे गावी थांबल्या. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी स्थान करुन वाळूचे शिवलिंग स्थापन केले व त्याची पूजा करु लागले. त्यावेळी कृष्णामाईस खूपच आनंद झाला व ती आनंदाने गर्जना करु लागली. तेव्हा प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे मारुतीराया उभे होते त्यांनी 'हा आवाज कसला' म्हणून पाठीमागे वळून राहिले तर नदीस महापूर येत असल्याचे त्यांना दिसले व त्याच क्षणी मारुतीरायांनी आपले बलवान बाहू बाजूस केले व नदीचे पाणी थोपवून धरले. त्यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवास वाहू लागले आणि आपोआपच बेट तयार झाले. मारुतीरायाच्या बाहूमुळे या गावचे नाव 'बाहे' असे पडले. काळाच्या ओघात त्यांचाअपभ्रंश होवून बहे नाव रुढ झाले, अशी आख्यायिका आहे.जवळपास अर्धा किलोमीटर रुंदीचे कृष्णा नदीचे विस्तीर्ण नदीपात्र, याच नदीपात्राचे पडलेले दोन भाग आणि त्यामध्ये निर्माण झालेले रामलिंग बेट पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. हीच निसर्गसंपदा डोळ्यासमोर ठेऊन बहे रामलिंग बेट पर्यटनास चालना देण्यात आली. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हे पर्यटन स्थळ विकसित होत असून यामध्ये रामलिंग परिसर, बोटिंग धक्का, पदपथ, उपहारगृह, घाट व संरक्षक भिंत, खुला रंगमंच, तलाव, वाहनतळ, भक्तनिवास, पुजारी निवास, स्वच्छतागहे तसेच प्रभू राम व श्री हनुमान मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात येत आहे. मंदिराच्या अंतर्गत आणि बाह्य सुधारणाबरोबरच सभोवताली आकर्षक घाट, बेटाला संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता यावा यासाठी नौका तैनात असून यासाठी कृष्णानदीकाठी धक्का बांधण्यात आला आहे. तसेच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी रामलिंग बेट परिसरात कृष्णानदीच्या पात्रात खुला रंगमंच तयार करण्यात आला आहे.बेटाच्या दोन्ही बाजूंनी खळखळणारे कृष्णामाईचे पाणी आणि नदीपात्रातील वृक्षवल्ली पर्यटकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. रामलिंग बेट पर्यटन स्थळ विकसित होत असल्याने सांगली जिल्ह्याच्या पर्यटनास नवी दिशा मिळणार असून, यातूनच जिल्ह्यातील तरुणांना पर्यटन रोजगाराचं नवं दालन उपलब्ध झालं आहे.निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेले आणि पौराणिक पाश्वभूमी असलेल्या बहे रामलिंग बेट परिसरात पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विविध सुविध निर्माण करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे हे बेट जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्टातील पर्यटकांना खुणावते आहे.
संपर्कासाठी पत्ता:श्री. विठ्ठल पाटीलसरपंच ग्रामपंचायत बहे,ता. वाळवा, जि. सांगली
संपर्कासाठी पत्ता:श्री. विठ्ठल पाटीलसरपंच ग्रामपंचायत बहे,ता. वाळवा, जि. सांगली
No comments:
Post a Comment